गोवा विभागीय टपाल कार्यालयातर्फे टपाल तिकीट, पाकिटाचे प्रकाशन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

गोवा पोस्टल विभागातर्फे आज एका आगळ्यावेगळ्या टपाल तिकीट आणि पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले. ‘कोरोना’शी लढताना ‘मानसिक आरोग्य सांभाळा’ असा त्या तिकिटाचा विषय आहे.

पणजी : गोवा पोस्टल विभागातर्फे आज एका आगळ्यावेगळ्या टपाल तिकीट आणि पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले. ‘कोरोना’शी लढताना ‘मानसिक आरोग्य सांभाळा’ असा त्या तिकिटाचा विषय आहे. या विशेष तिकीट आणि पाकिटाच्या प्रकाशनामध्ये गोवा फिलेटेलिक ॲण्ड न्युमिझमॅटिक सोसायटीची मोठी सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे.

 
टपाल भवन पणजी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गोवा टपाल खात्याचे आयपीओएस, सीनियर सुप्रिटेंडन्ट डॉ. सुधीर जी जखेरे, डॉ. मानसोपचार सोसायटी ऑफ गोवाचे अध्यक्ष अभिजित नाडकर्णी, गोवा फिलेटेलिक ॲण्ड न्यूमिझमॅटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये सहकार्य करण्यासाठी ‘कोविड-१९’ सोबत लढा देण्यासाठीच्या तिकिटांमध्ये आरोग्य सेतूचे वर्णन करण्यात आले आहे.  ‘कोरोना’ काळात टपाल खात्याने अनेक पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न केले आहेत. या टपाल तिकिटांचे प्रकाशन हा त्यातीलच एक भाग असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

ही टपाल तिकिटे आणि पाकिटे केवळ २५ रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत. ही तिकिटे पाहण्यासाठी मडगाव टपाल खात्याच्या कार्यालयात ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत आणि १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पणजी टपाल खात्याच्या कार्यालयात ठेवली जाणार आहेत.

संबंधित बातम्या