गोव्याच्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

यापूर्वीच्या निवडणुकांचे अनुभव चांगले नाहीत त्याशिवाय ईव्हीएम मशीनही (EVM Machine) हॅक होण्याचा संशय आहे. त्यामुळे ह्या निवडणूका मत पत्रिकेवरच्या (Ballot Paper) आधारावर व्हावेत
गोव्याच्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
NCP Leader Sanjay BardeDainik Gomantak

गोव्यातल्या विधानसभेच्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवर न घेता मत पत्रिकेवर (Ballot Paper) घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा शाखेने केली आहे तसे निवेदन मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी दिले आहे.

NCP Leader Sanjay Barde
निवडणूकीचे वारे: ‘आप’च्या एका दिवसात 80 सभा

गोव्यातल्या निवडणुका या भयमुक्त वातावरणात व्हावेत अशी मागणी करत यापूर्वीच्या निवडणुकांचे अनुभव चांगले नाहीत त्याशिवाय ईव्हीएम मशीनही हॅक होण्याचा संशय आहे. त्यामुळे ह्या निवडणूका मत पत्रिकेच्या आधारावर व्हावेत, गोव्यातील मतदान अत्यंत कमी असल्याने निकाल प्रक्रिया ही खूप कमी काळ चालते त्यामुळे तिथल्या निवडणुका मत पत्रिकेवरच करा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिले आहे.

Related Stories

No stories found.