कर्करोगापासून वेळीच खबरदारी घ्या: मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

कर्करोगा बाबतीत वेळीच उपचार सुरु केले, तर या जीवघेण्या रोगापासून आपले प्राण वाचू शकतात. तेव्हा कर्करोगाची लक्षणे जाणवल्यास वेळीच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्‍त केले.

 

डिचोली : कर्करोगा बाबतीत वेळीच उपचार सुरु केले, तर या जीवघेण्या रोगापासून आपले प्राण वाचू शकतात. तेव्हा कर्करोगाची लक्षणे जाणवल्यास वेळीच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्‍त केले. न्हावेली-डिचोली येथे महिलांसाठी आयोजित कर्करोगावरील जागृती कार्यक्रमाचे उद्‌घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.

राष्ट्रीय कर्करोग जागृती दिनाचे औचित्य साधून  साई लाईफ केअर या बिगर सरकारी संघटनेच्या सहकार्याने आग्नेल एन्टरप्रेनरशीप डेव्हलोपमेंट संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वक्‍ते म्हणून नामवंत कर्करोग तज्ञ डॉ. शेखर साळकर उपस्थित होते. अन्य मान्यवरात न्हावेलीच्या सरपंच सौ. गावस आणि अन्य पंचसदस्य, आग्नेल एन्टरप्रेनरशीप डेव्हलोपमेंट संस्थेच्या नेहा तळावलीकर आणि सदस्य यांचा समावेश होता. डॉ. शेखर साळकर यांनी मार्गदर्शन करताना कर्करोगाची सध्याच्या आकडेवारीबद्‌दल माहिती दिली. कर्करोगासंबंधी वेगवेगळ्या टप्प्यातील उपचार पध्दतींचीही त्यांनी माहिती दिली. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यावी आदी सल्लाही डॉ. साळकर यांनी दिला. 

सुरवातीच्या काळात वेळीच उपचार केलेत, तर या रोगावर मात करता येते. असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे डॉ. साळकर यांनी निरसन केले. नेहा तळावलीकर यांनी स्वागत 
केले.

संबंधित बातम्या