धडक कारवाई करत महापालिकेने पणजीतील 200 कसिनोंचे फलक हटवले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

महापालिकेचे महापौर मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी नदीतील काही कसिनोनी महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी कसिनोंची जाहिरात करणारे फलक लावले होते.

पणजी :  पणजी महापालिकेने आज एका धडक कारवाईत पणजी परिसरातील कसिनोचे २०० फलक हटवले. पणजी ते पर्वरी या रस्त्यालगत तसेच पाटो व पणजी कदंब बसस्थानक परिसरात महापालिकेची परवानगी न घेता लावण्यात आलेले हे फलक पणजी महापालिकेच्या बेकायदा कामावर कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आत्तापर्यंत 1000 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

महापालिकेचे महापौर मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी नदीतील काही कसिनोनी महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी कसिनोंची जाहिरात करणारे फलक लावले होते. त्याबाबत अतिक्रमण विरोधी पथकाने सदर फलक हटवण्याची सूचना कसिनो चालकांना केली होती. मात्र त्यांनी सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज कारवाई करून हे बेकायदेशीर लावलेले सर्व फलक हटवले.

गोवा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सरकारी जागांवर अतिक्रमण झाल्यास अधिकारी...

सदर कसिनोचालकांना फलकाचे नियमानुसार शुल्क भरण्याचे कळवण्यात आले असून  त्यांनी शुल्क भरल्यानंतर जेवढ्या फलकांचे  शुल्क भरले जाईल, तेवढेच फलक लावण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले. जाहिरातीची परवानगी देताना पणजीच्या सुंदरतेला बाधा येणार नाही, याची काळजी पणजी महापालिका व संबंधित खात्यांनी घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या