Talpona river गाळाने भरल्याने मच्छीमारांच्या समस्यात वाढ

तळपण तटावर कृत्रिम जेटी तयार करण्याची मागणी
Talpona river
Talpona riverDainik Gomantak

काणकोण: तळपण नदीची खाडी गाळाने पूर्णत: भरल्याने मच्छीमारांना बोटी समुद्रात नेणे व जेटीवर आणणे त्रासदायक ठरत आहे. यावर तोडगा म्हणून जेटीच्या विरूद्ध बाजूला राजबाग येथे तळपण नदीच्या तटावर समुद्रात दगडाची भिंत बांधून कृत्रिम जेटी तयार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

(Talpona river filled with mud and increasing problems of fishermen)

तळपण जेटी सध्‍या अपुरी पडत असून डागडुजी करून तिचा विस्तार करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक वेळा मच्‍छीमार खात्याला निवेदने देण्यात आली, परंतु काही उपयोग झाला नाही. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्‍यांनी या जेटीची पाहणी केली होती, असे येथील एक मत्स्यव्यावसायिक माजी पंच रुद्रेश नमशीकर यांनी सांगितले.

Talpona river
MLA Viresh Borkar: फुटीर आमदारांविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स आक्रमक

तळपण खाडीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे तळपण नदीचा राजबाग किनारा व तळपण जेटी यामधील खाडीची रुंदी कमी होत आहे. राजबाग किनाऱ्यावरील रेती तळपण नदीच्या पात्रात साचून वाळूचा दांडा तयार होत असल्याने मच्छीमार बोटीना त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटी तळपण जेटीवर न आणता बेतुल जेटीवर नांगराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे तळपण जेटीवर इंधनाची सोय नसल्याने मच्छीमारांची कुचंबणा होत आहे. या सर्व समस्याचे निराकरण मासेमारी खात्याने त्वरित करावे अशी मागणी नमशीकर यांनी केली आहे.

Talpona river
Congress MLA: बंडखोर निघाले दिल्लीश्वराच्या दर्शनाला

तळपण खाडीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे तळपण नदीचा राजबाग किनारा व तळपण जेटी यामधील खाडीची रुंदी कमी होत आहे. मच्छीमारांना आपल्या बोटी तळपण जेटीवर न आणता बेतुल जेटीवर नांगराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे तळपण जेटीवर इंधनाची सोय नसल्याने मच्छीमारांची कुचंबणा होत आहे. असे माजी पंच तथा मत्स्यव्यावसायिक रुद्रेश नमशीकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com