डिचोलीत पालिका परिसरात दोन दिवसांपासून नळ कोरडे

वीज समस्येमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम
Water Problem
Water ProblemDainik Gomantak

डिचोली : डिचोली पालिका क्षेत्रातील काही भागांत पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भर पावसात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांचे विशेषतः गृहिणींचे पुरते हाल झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मारामारी झाल्याने नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

शहरातील कातरवाडा, आयडीसी, जोगीवाडा आदी भागांत कालपासून (गुरुवारी) नळांना धड पाणी येत नसल्याने नागरिकांना विशेषत: गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एका बाजूने पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाण्यासाठी घराबाहेर जाणेही अवघड बनले आहे. पाणी पुरवठा खात्याने त्वरित ही समस्या दूर करावी. अशी मागणी नागरिक विशेषतः गृहिणींकडून करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार वीज समस्येमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com