गोव्यातील महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या तारा केरकर आता निवडणुकीसाठी सज्ज
श्रीमती तारा केरकरDainik Gomantak

गोव्यातील महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या तारा केरकर आता निवडणुकीसाठी सज्ज

तारा केरकर यांनी विधानसभा निवडणूक आपल्या पक्षातर्फे लढवावी अशी मागणी राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षांनी केली असल्याची माहिती तारा केरकर यांनी दिली आहे.

संपूर्ण गोव्यात महिलांवरील (Goa Womens) होणाऱ्या अत्याचाराला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणारी तसेच समाज कार्यात अग्रेसर असलेली बिगर सरकारी संस्था 'सवेरा' (Savera) संस्थेची अध्यक्ष तथा मोरगाव नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष श्रीमती तारा केरकर (Tara Kerkar) पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. तारा केरकर यांनी विधानसभा निवडणूक आपल्या पक्षातर्फे लढवावी अशी मागणी राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षांनी केली असल्याची माहिती तारा केरकर यांनी दिली आहे.

श्रीमती तारा केरकर
Goa Politics: समविचारी पक्षांना युतासीठी 'भाजपा'ची दारे खुली

वास्को नवेवाडे हाऊसिंग बोर्ड मध्ये राहणारी माजी नगराध्यक्ष तथा 'सवेरा' संस्थेची अध्यक्ष श्रीमती तारा केरकर यांनी वास्को, मुरगांव, दाबोळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. तारा केरकर यांची समाजसेवा गोव्यातील गरीब कुटुंबाबरोबर सदैव असते. राज्यातील महिलावर एकाद्याने अत्याचार केले असता तारा केरकर त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करीत राहते. एखाद्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यास राज्य गृह विभागाला सहकार्य करण्यासाठी तारा केरकर अग्रेसर असते. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर तारा केरकर याने 'सवेरा' बिगर सरकारी संस्था स्थापन करून महिलांना त्याचा हक्क देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्को मुरगाव नगरपालिकेत तीन वेळेला नगरसेविका म्हणून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार संभाळला आहे. पालिका बैठकीत विविध विषयाचा अभ्यास असल्याने तारा केरकर यांना पालिकेच्या अधिकारी वर्गाचा पाठिंबा लाभत होता. नगरसेविकेच्या कार्यकाळात तारा केरकर यांनी आपल्या प्रभागा बरोबर वास्कोच्या विकासात मोठे सहकार्य केले आहे.

श्रीमती तारा केरकर
जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिदंबरम

गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूक तारा केरकर दुसऱ्यांचा दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. गेल्या काही दिवसापासून तारा केरकर यांच्या संपर्कात राष्ट्रीय पक्षाबरोबर गोव्यातील प्रादेशिक पक्षही असल्याची माहिती तारा केरकर यांनी दिली. यासाठी मी सर्वप्रथम माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नंतरच एखाद्या पक्षांबरोबर बोलणी करणार असल्याची माहिती केरकर यांनी दिली. दाबोळीतील वाडे, चिखली, आल्त दाबोळी, बोगमाळो भागात केरकर यांना नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. यामुळे यंदा तारा केरकर दाबोळीतून राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com