Goa Taxi App: टॅक्सी चालकांचा ‘गोवा टॅक्सी’ ॲपला विरोधच! तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...

डिजिटल मीटर बसवूनही सरकार ॲप आणण्याचा आग्रह का करत आहे, असा सवाल त्यांनी केला.
Taxi Meter
Taxi Meter Dainik Gomantak

गोवा: गोवा सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘गोवा टॅक्सी’ कॅब ऍग्रीगेटर ॲपला सर्व गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी आज तीव्र विरोध दर्शवला. पणजीतील आझाद मैदानावर आज ऑपरेटर्सची बैठक झाली. डिजिटल मीटर बसवूनही सरकार ॲप आणण्याचा आग्रह का करत आहे, असा सवाल त्यांनी केला. सरकारने त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा टॅक्सी चालकांनी दिला.

(Goa Taxi App)

Taxi Meter
Goa: एफडीएच्या कारवाईत मडगाव येथील मिठाईवाल्याकडून तब्बल 1.20 लाखांचा मावा जप्त

अॅप बेस्ड टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी

दरम्यान गोवा माईल्स या अॅप बेस्ड टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आला. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.

सर्व टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन ॲपची अंमलबजावणी करण्यात येईल; रोहन खंवटे

गोवा टॅक्सी अॅप हे गोव्यातील टॅक्सी मालकांसाठीच असेल, असे अश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले, ते पुढे म्हणाले "सर्वच आमदार आणि टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन पुढील वर्षापासून ॲपची अंमलबजावणी करण्यात येईल".

Taxi Meter
Vasco: वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्या हस्ते तीन अभंगाचे लोकार्पण

गोवा माईल्स काऊंटरच्या उद्घाटनापूर्वी एकाने या काऊंटरला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक करत 151 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

नववर्षाआधीच हे अॅप लॉन्च करण्याचा सरकारचा मानस

गोवा सरकारचं वाहतूक खातं आणि पर्यटन खातं मिळून हे खास टॅक्सी अॅप तयार करणार आहेत. या अॅपच्या कामासाठी एका कंपनीसोबत बोलणीही सुरु असून गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही कंपनी नवीन टॅक्सी अॅप तयार करणार आहे. नववर्षाआधीच हे अॅप लॉन्च करण्याचा सरकारचा मानस असून या अॅपमध्ये गोव्यातील सर्व टॅक्सीचालकांना सामावून घेतलं जाणार असल्याचं माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com