गोवा: सरकारच्या दबावाला झुगारुन पुन्हा आजाद मैदानावर आंदोलन...

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

144 कलम लागू केले असतानाही टॅक्सी व्यावसायिकांनी शक्तीप्रदर्शन करून धरणे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला.

मोरजी: आमदार दयानंद सोपटे यांच्या विरोधात 18 रोजी सायंकाळी उत्तर गोव्यात जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे 144 कलम लागू केले असतानाही टॅक्सी व्यावसायिकांनी शक्तीप्रदर्शन करून धरणे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला. राज्यात जमावबंदी लागू केली असतानाही टॅक्सी व्यावसायिकांनी आपला मोर्चा थेट चोपडे येथे वळवला. 800 पेक्षा जास्त टॅक्सी व्यावसायिकांनी चोपडे परिसरात भव्य मोर्चा काढला. त्यानंतर एकादिवसाचे धरणे आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी जमून वकील प्रसाद शहापूरकर आणि इतरांना ‘ज्यूस’ देऊन एका दिवसाचे आंदोलन समाप्त करण्यात आले.(Taxi protesters will protest again on Azad Maidan on Monday)

टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 19 रोजी सायंकाळी 4 वाजता चोपडे शाळेकडे मांद्रे मतदारसंघातील सर्व पक्षाचे नेते एकत्रित येऊन पुढील कृती ठरवण्याविषयी निर्णय घेणार आहे. सरकारने 144 कलम लागू करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, तरी त्याची आम्ही पर्वा करणार नाही. पुन्हा आजाद मैदानावर (Azad Maidan Goa) जमा होऊन आंदोलन करणार आहोत, असे टॅक्सी चालकांनी (Taxi Drivers) आज असे जाहीर केले.

गोवा: कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

मांद्रे मतदारसंघातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन (Taxi Protest) मांद्रेचे वकील प्रसाद शहापूरकर यांनी सकाळपासून सुरु केले. अनपेक्षित या धरणे आंदोलनाला सकाळी शेकडो स्थानिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. सायंकाळी मात्र या धरणे आंदोलनाला वेगळेच वळण लावून राज्यातील विविध भागातून  टॅक्सी मालकांनी या आंदोलनात चोपडे येथे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि 800 पेक्षा जास्त व्यावसायिक जमा होऊन चोपडे परिसरात शक्ती प्रदर्शन केले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो व्यावसायिक, मालक सहभागी झाले होते.
फॉरवर्डचे जितेंद्र गावकर, दीपक कलंगुटकर, मगोचे जीत आरोलकर, देवेंद्र प्रभुदेसाई यांनी भाग घेतला.सोमवारी आझाद मैदानावरही  शासनाच्या विरेोधात आंदोलन करण्याचा निर्धार टॅक्सी चालकांनी केला आहे.

संबंधित बातम्या