डिजीटल मीटर्स नसल्यास टॅक्सींवर कारवाई

वाहतूक खात्याची खंडपीठाला माहिती
Taxi in Goa
Taxi in GoaDainik Gomantak

पणजी: गोव्यातील बहुतेक टॅक्सींना डिजिटल मीटर बसविले आहेत. सध्या फक्त 50 टॅक्सी डिजिटल मीटर बसवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या टॅक्सींना मीटर नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वाहतूक खात्याकडे नोंद असलेल्या 11025 पैकी 9362 टॅक्सींना डिजिटल मीटर बसवले आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिल्याने ‘टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा’ने (टीटीएजी) सादर केलेली याचिका निकालात काढण्यात आली. (taxis do not digital meters in Goa, action will be taken by the transport department )

Taxi in Goa
गोव्यात अंगणवाड्या 1 जुलैपासून पुन्हा उघडणार!

केंद्र सरकारने देशातील सर्व टॅक्सींना डिजिटल मीटरची सक्ती केल्यानंतरही गोव्यात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. टॅक्सीचालकांनी भरमसाट भाडे आकारून पर्यटकांची सतावणूक केल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याची याचिका ‘टीटीएजी’ने सादर केली होती. त्याची दखल घेत खंडपीठाने सरकारला टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासंदर्भात पावले उचलण्याचे निर्देश देताना त्याचा वेळोवेळी अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

त्यामुळे टॅक्सी परवान्याची मुदत संपल्यानंतर डिजिटल मीटर बसविल्याशिवाय नूतनीकरण न करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला होता. तसेच जे टॅक्सीचालक डिजिटल मीटर नसतानाही रस्त्यावर येतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू केल्यावर टॅक्सीचालकांनी मीटर बसवण्यास सुरवात केली होती.

मीटर नाही, नूतनीकरण नाही

राज्यात सुमारे 17 हजार टॅक्सी असून अद्याप बऱ्याच चालकांनी डिजिटल मीटर बसविले नसल्याचा मुद्दा याचिकादाराच्या वकिलांनी उपस्थित केला असता, सरकारतर्फे त्याला आक्षेप घेण्यात आला. ज्या टॅक्सींना डिजिटल मीटर नाही, त्या वाहतूक खात्यातर्फे ताब्यात घेण्यात येत आहेत. ज्यांनी डिजिटल मीटर बसविलेले नाही, त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे या टॅक्सी रस्त्यावर येऊ शकत नाहीत, असे वाहतूक खात्यातर्फे सांगण्यात आले.

या कारणास्तव टॅक्सींना मीटर नाही

- ‘रेंट अ कार’ तसेच मेक्सी टॅक्सी यांना डिजिटल मीटरची सक्ती नाही.

- काही टॅक्सी जुन्या झाल्याने त्या वापराविना असाव्यात.

- काही टॅक्सींचे रेंट अ कार तसेच खासगी वाहनामध्ये बदल केल्याची शक्यता आहे.

- काही टॅक्सी थकबाकी असल्याने बँकांनी ताब्यात घेतल्या असाव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com