कार्यालयात जाणारी वाटही अडचणीची

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

पेडणे बसस्थानकाच्या इमारत प्रकल्पात गेली दोन तीन वर्षे शहर व नगर नियोजन कार्यालयासाठी कार्यालय तयार असताना अद्याप नगर नियोजन कार्यालय हे खासगी इमारतीतील अपुऱ्या जागेत आहे. लोकांना अडचणीच्या  वाटेतून जावे लागत आहे.

 

 पेडणे: पेडणे बसस्थानकाच्या इमारत प्रकल्पात गेली दोन तीन वर्षे शहर व नगर नियोजन कार्यालयासाठी कार्यालय तयार असताना अद्याप नगर नियोजन कार्यालय हे खासगी इमारतीतील अपुऱ्या जागेत आहे. लोकांना अडचणीच्या  वाटेतून जावे लागत आहे. या खासगी इमारतीतील हे कार्यालय सोयीस्‍कर अशा बसस्थानकातील इमारतीत स्थलांतरीत करण्यात यावे, अशी लोकांची मागणी आहे.

सध्‍या खासगी इमारतीत असलेल्या हे शहर व नगर नियोजन कार्यालय सहजपणे दिसत नाही. ते शोधावे लागते. ह्या कार्यालयात जाणारी वाटही अडचणीची आहे. या ठिकाणी बसस्थानक प्रकल्प बांधताना तत्कालीन आमदार तथा सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी या इमारतीत शहर व नगर नियोजन कार्यालय, त्यावेळी फाजेंत इमारत मोडकळीस आलेल्या इमारतीत असलेल्या अबकारी कार्यालयाला व राष्ट्रीय बॅंकेसाठीच्या कार्यालयाला या इमारतीत जागा ठेवण्यासाठीची सूचना केली होती. त्यानुसार या बसस्थानक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाहतूक कार्यालयासमोर तीन कार्यालयासमोर तीन कार्यालयासाठी जागेची इमारत बांधतानाच तरतूद केली होती. त्यानुसार शहर व नगर नियोजन कार्यालय तसेच अन्य दोन कार्यालये गेल्या दोन तीन वर्षापासून  तयार आहेत. त्यापैकी जे अबकारी कार्यालयासाठी राखून ठेवले होते. पण, अबकारी कार्यालयाला नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या त्यांच्या पूर्वीच्याच फाजेंत इमारतीत कार्यालय 
मिळाले. 

शहर व नगर नियोजन कार्यालय वगळता अन्य दोन कार्यालये तयार स्थितीत आहेत. ज्यात  टेबल, खुर्ची, केबीन, आदी सर्व वस्तू आहेत. वापराविना व आवश्यक निगा न घेतल्यामुळे या किंमती वस्तू खराब होण्याची शक्यता आहे. अशा या तयार स्थितीत असलेल्या दोन कार्यालयात वजन व माप खाते कार्यालय  व पशुसंवर्धन कार्यालय  ह्या खासगी इमारतीत असलेल्या कार्यालयांना आणणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या