‘टीसीपी’ची ऑनलाईन मान्यता प्रणाली सक्तीची

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) ई - बिल्डिंग प्लॅन मान्यता व्यवस्थापन प्रणाली (बीपीएएमएस ) या इमारतींना मान्यता देण्याच्या ऑनलाईन प्रणालीचा वापर आता येत्या १ नोव्हेंबर म्हणजे परवापासून सक्तीचा होणार आहे.  

पणजी: नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) ई - बिल्डिंग प्लॅन मान्यता व्यवस्थापन प्रणाली (बीपीएएमएस ) या इमारतींना मान्यता देण्याच्या ऑनलाईन प्रणालीचा वापर आता येत्या १ नोव्हेंबर म्हणजे परवापासून सक्तीचा होणार आहे.  

खात्याच्या या ई - बिल्डिंग प्लान अप्रोवल मॅनेजमेंट सिस्टिम (बीपीएएमएस) या इमारतींना परवानगी वा मान्यता देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑटोमेटिन्ग बिल्डिंग परमिशन प्रक्रियेला म्हणावा तसा समाधानकारक प्रतिसाद लाभलेला नाही, असे नगरनियोजन खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की ही ऑनलाईन प्रणाली तीन महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था किंवा ऑपशनल पद्धतीची होती पण आता परवापासून 1 नोव्हेंबरपासून सक्तीची होणार आहे.

व्यवसाय सुधारणा कृती आराखडा म्हणजेच बिझिनेस रिफॉर्म एक्शन प्लान (बीआरएपी ) या महत्वाच्या उपक्रमाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन पद्धतीचा ऑटोमेटेड सिस्टिम्सचा उपयोग बांधकाम आराखडे सिंगल ड्वेलिंग युनिट्ससाठी सबमिशन प्रक्रियेसाठी करण्याच्या दृष्टीने करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. परवानगी व मान्यता प्रक्रिया सुसह्य करण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी करण्यात येणार आहे. पण या प्रणालीला काहीच नसला तरीही फारच कमी जणांनी पसंती दिल्याने मिळालेला प्रतिसाद थंड आहे. नगरनियोजन खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या पोर्टलवर ३० पेक्षा कमी आर्किटेक्त्ट आणि व्यावसायिकांनी नोंदणीकरण आणि अधिकृतीकरण केलेले आहे. वेबवर आधारित असलेल्या या ऑनलाईन सिस्टिम अथवा प्रणालीवर आर्किटेक्त्ट व व्यावसायिकांना स्वतःला नोंदणीकृत करता येते, इमारतींचे आराखडे समाविष्ट करता येतात आणि तांत्रिक परवाने व ना हरकत दाखले व इतर प्रमाणपत्रे मिळविता येतात. ऑनलाईन प्रणालीवर माहिती व तपशील अपलोड झाल्यावर अपलोड केलेल्या बांधकाम रेखांकनांचे विश्लेषण प्रणालीतील सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक मोडवर किंवा स्वयंचलित पद्धतीने प्लानचे विश्लेषण केले जाते, साईटचे इन्स्पेक्शन किंवा निरीक्षण केले जाते आणि परवानगी दाखला मंजूर केला जातो. 

खात्याचे म्हणणे आहे की नगरनियोजन सर्व व्यावसायिकांना आणि आर्किटेक्ट्सना ''बीपीएएमएस '' प्रणालीवर नोंदणीकरण करण्यास सांगते आणि यशस्वीरीत्या नोंदणीकरण झाल्यावर ऑनलाईन तांत्रिक परवाना दाखल्यासाठी अर्ज करण्यास सांगते. आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की एकल घरांसाठी अजूनपर्यंत एकही अर्ज ऑनलाईन भरला गेलेला नाही. ही ऑनलाईन प्रणाली उद्योग करण्याची सुसह्यता वाढविण्यासाठी आणि तांत्रिक दाखला परवाने पारदर्शक पद्धतीने बहाल वा जारी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली. खात्याने सर्व अधिकाऱ्यांना सक्त  आदेश दिलेले आहेत की ऑफलाईन अर्ज ''सिंगल ड्वेलिंग फॅमिली युनिट्स '' या कटुंबाधारित एकल अधिवासांसाठी स्वीकारणे बंद करा आणि हा नियम 2 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. नगरनियोजन खात्याला अपेक्षा आहे की व्यावसायिक आणि अर्किटेक्ट यांच्याकडून पुरेपूर सहभाग आणि सहकार्य मिळेल जेणेकरून कार्यक्षम, पारदर्शक आणि कालबद्ध सुटसुटीत अशी सेवा नागरिकांना देणे शक्य होईल, असे खात्याच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या