विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच किमयागार: सदानंद शेट तानावडे

अध्यापक गोपाळ धर्मा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच किमयागार: सदानंद शेट तानावडे
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

हळदोणा: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या मनोभूमीत संस्काराची बीजे पेरणारा शिक्षकच खऱ्या अर्थाने किमयागार असतो, असे प्रतिपादन पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

पीर्ण महा शालेय संकुल परिवाराच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे औचित्य साधून सरकारी माध्यमिक विद्यालय,मेणकुरे येथील राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त अध्यापक गोपाळ धर्मा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

सत्कारमूर्ती सावंत यांच्या विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या समर्पित वृत्तीचे शिक्षकांनी अनुकरण करावे, असे आवाहन उपस्थित शिक्षकांना तानावडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पीर्ण महाशालेय संकुलचे अध्यक्ष प्राचार्य उमेश नाईक, सचिव प्रा.रामचंद्र नाईक देसाई, मुख्याध्यापिका राजननिता सावंत, ममता नाईक, सर्वदा गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र नाईक देसाई प्रा. अपूर्वा सावंत यांनी केले. प्रा.गंधाली परब यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.