शिक्षिका हेमा बुगडे यांचा गोवा सरकारतर्फे सन्मान

वार्ताहर
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

 

पर्वरी ता २२ : (वार्ताहर)ः  प्रशिक्षार्थींचे कौशल्य विकासित करून प्रशिक्षित लाभार्थींना स्वावलंबी करण्याचे उत्कृष्ट कार्य जनशिक्षण संस्थान गोवाच्या कौशल्य शिक्षिका  हेमा बुगडे करत आहेत.  

 भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री मा.महेन्द्रनाथ पांडे यांच्या हस्ते हेमा बुगडे यांना ‘कौशल्याचार्य पुरस्कार २०२०’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  ही घटना गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. 

पर्वरी:  प्रशिक्षार्थींचे कौशल्य विकासित करून प्रशिक्षित लाभार्थींना स्वावलंबी करण्याचे उत्कृष्ट कार्य जनशिक्षण संस्थान गोवाच्या कौशल्य शिक्षिका  हेमा बुगडे करत आहेत.  

 भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री मा.महेन्द्रनाथ पांडे यांच्या हस्ते हेमा बुगडे यांना ‘कौशल्याचार्य पुरस्कार २०२०’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  ही घटना गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. 

 कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्यासाठी काम करणा-या व्यक्तींनी गोव्यातील तरुणांना प्रशिक्षित करून विविध क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावेत असे उद्गार महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोवा सरकारच्या वतीने प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करताना काढले.  यावेळी गोवा राज्याचे मुख्य सचिव सी.आर.गर्ग, कौशल्य विकास व उद्यमिता विभाग गोवा चे संचालक दीपक देसाई तसेच कौशल्याचार्य पुरस्कार २०२० ने सन्मानित झालेले सपना पै आंगले व विवेक परिसनाथ नाईक उपस्थित होते. कौशल्य विकास व उद्यमिता विभाग गोवा सरकारचे संचालक दीपक देसाई तसेच सहाय्यक संचालक राजेश लोलयेकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच जिल्हा ग्रामीण विकास विभाग  (डीआरडीए) कार्यालयातून मिळणारे मार्गदर्शन आणि गोवा सरकारच्या हस्तकला विभागातर्फे मिळणारी मदत मला कौशल्य विकास क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा देते.  जन शिक्षण संस्थान गोवा चे संचालक श्रीहरी आठल्ये व कार्यक्रम अधिकारी निमिषा पळ व निनाद वेळगेकर यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाने व आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे उपक्रम राबविण्याची संधी दिल्यामुळे मी कौशल्याचार्य पुरस्कार २०२०’ हा राष्ट्रीय पुरस्काराने मानांकित होऊ शकले असे हेमा बुगडे यांनी सांगितले.  दरम्यान हेमा बुगडे यांचा गोवा सरकारच्या वतीने 'प्रशंसा प्रमाणपत्र' देऊन केलेल्या गौरवामुळे यशस्वी कारकिर्दीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे असे गौरवास्पद उद्गार श्रीहरी आठल्ये यांनी काढले. 

संबंधित बातम्या