Goa : वाढीव निवृत्ती वेतन लाभापासून शिक्षक अजून दूरच

केंद्र सरकारने निवृत्त सरकारी नोकरदारांसाठी सुधारित वाढीव निवृत्ती वेतन योजना लागू केली असली तरी गोव्यातील (Goa) निवृत्त प्राथमिक शिक्षक मात्र या योजनेपासून वंचित आहेत.
Goa : वाढीव निवृत्ती वेतन लाभापासून शिक्षक अजून दूरच
Goa : Retired primary teacher Gomantak

फोंडा (प्रतिनिधी) ः केंद्र सरकारने निवृत्त सरकारी नोकरदारांसाठी सुधारित वाढीव निवृत्ती वेतन योजना लागू केली असली तरी राज्यातील (Goa) निवृत्त प्राथमिक शिक्षक (Retired primary teacher) मात्र या योजनेपासून वंचित आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार गोवा राज्यातही ही सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली, मात्र प्राथमिक शिक्षक या योजनेच्या लाभापासून दूरच असल्याची माहिती गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक सरचिटणीस जयवंत आडपईकर यांनी देऊन सरकारने वंचित शिक्षकांना त्वरित योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही योजना लागू करून त्याचा लाभ मिळवून दिला.

Goa : Retired primary teacher
Goa: अखेर त्या मुख्याध्यापिकेची बदली...

या योजनेनुसार गोवा सरकारनेही आपल्या अखत्यारितील या योजनेनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अशा निवृत्त कर्मचाऱ्यांकडून आवश्‍यक अर्ज भरून घेतले. त्यात निवृत्तीपूर्वीची व सध्याच्या वेतनश्रेणीची माहिती घेण्यात आली. या सुधारित निवृत्ती वेतनाची थकबाकी २०१९ पासूनच मिळेल असे सूचित करण्यात आले होते आणि लाभार्थींना या योजनेचा त्वरित फायदा व्हावा यासाठी लेखा खात्याला आवश्‍यक कार्यवाहीचे आदेशही दिले होते.
राज्य सरकारच्या या आदेशानंतर सुधारित निवृत्ती वेतन देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आणि बहुतांश सरकारी खात्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला व थकबाकीही अदा झाली. प्राथमिक शिक्षक मात्र या योजनेपासून अजून वंचित असून विशेषतः फोंडा तालुक्यातील एकाही निवृत्त शिक्षकाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. फोंडा तालुक्यातील बहुतांश निवृत्त शिक्षक हे पंचाहत्तरी पूर्ण केलेले आहेत. या निवृत्ती वाढीव वेतनाचा लाभ आम्हाला मिळणार कधी, असा सवाल करून सरकारने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी फोंडा तालुक्यातील निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.