शिक्षण संचालकांकडून शिक्षक वेठीस 

विलास महाडिक
शुक्रवार, 10 जुलै 2020

२९ जून २० रोजी केंद्राने अनलॉक - २ करताना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शैक्षणिक संस्था ३१ जुलै २० पर्यंत बंद ठेवण्याचे नमूद करण्यात आले आहे.

पणजी

देशात ३१ जुलै २० पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये घोषित करण्यात आले आहे मात्र गोवा सकार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये उपस्थिती लावण्याची सक्ती करून वेठीस धरले आहे. त्यांना जर कोरोना बाधिताची लागण झाल्यास शिक्षणमंत्री असलेले मुख्यमंत्री व शिक्षण संचालक जबाबदार असतील असा आरोप गोवा फॉरवर्डने केला. 
पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की, २९ जून २० रोजी केंद्राने अनलॉक - २ करताना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शैक्षणिक संस्था ३१ जुलै २० पर्यंत बंद ठेवण्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये उपस्थिती लावण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला आहे. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकणांमध्ये गुंतवणूक केली आहे. ६ जुलै २० रोजी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला होता त्यामध्ये शिक्षकांना घरातून काम करण्याचे नमूद कऱण्यात आले होते तरी राज्य सरकार व शिक्षण संचालक या सूचनांबाबत गंभीर नाहीत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजेरी लावण्याचे निर्देश राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जर झपाट्याने वाढली तर आवश्‍यक साधनसुविधा उपलब्ध नाहीत. गेल्या २० मार्चला मुख्यमंत्र्यांनी राज्यात २०० वेंटीलेटर्स लवकरच उपलब्ध होणार आहे अशी घोषणा केली होती मात्र आजवर ते पोहचलेले नाहीत. काही शाळा व्यवस्थापनांनी शैक्षणिक वर्षे सुरू झाले नसतानाच पालकांना शुल्क भरण्यास सांगत आहे यावरून ही लोकांची लूटमार चालली आहे, अशी टीका कामत यांनी केली. 
शिक्षण संचालक या आयएएस अधिकारी असल्या तरी शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही. शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित न राहिल्यास त्यांचे वेतन कापण्याची धमकी त्या देत आहेत. सरकारने या संचालकपदावर गोव्यातील शिक्षण क्षेत्राचा अनुभव 
असलेल्या व्यक्तीची वर्णा लावावी. या संचालकांच्या हेकेखोरपणामुळे शिक्षक व शिक्षकेतर आरोग्य धोक्यात आल्यास त्या तसेच मुख्यमंत्री जबाबदार राहतील. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे सरकारे पालन करावे अशी मागणी कामत यांनी केली. जर 
शिक्षकांना कोरोना लागण झाली तर मुख्य सचिव व शिक्षण संचालक यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल केला जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
 

संबंधित बातम्या