पॉवर ग्रीड वीज प्रकल्पात बिघाड; बार्देश, पेडणे व डिचोलीतील पुरवठ्यात व्यत्यय

power grid electricity project goa
power grid electricity project goa

म्हापसा- कोलवाळ येथील पॉवर ग्रीड वीज प्रकल्पात आज रविवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका बार्देश, पेडणे व डिचोली तालुक्यातील वीजग्राहकांना बसला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर वीज वाहिनीतील तांत्रिक बिघाडावर पॉवर ग्रीडच्या कर्मचाऱ्यांनी उपाय काढला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.

कोल्हापूरहून कोलवाळ पॉवर ग्रीडला जोडणा‍ऱ्या वाहिन्यांमध्ये रविवारी दुपारी दोनच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, पॉवर ग्रीडला जोडणारी मुख्य वीजवाहिनी ट्रिप झाली व त्यामुळे थिवी व माशेल येथील मुख्य वीज उपकेंद्रे अकार्यक्षम झाली. कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाला जोडणाऱ्या मुख्य वाहिनीतील बिघाड शोधून काढला व त्यासंदर्भात उपाययोजनाही केली.    

थिवी वीज उपकेंद्रामार्गे होणाऱ्या वीजपुरवठ्यात व्यत्यय आल्याने बार्देश तालुक्यातील म्हापसा, साळगाव, पर्वरी, नास्नोळा, नागवा, कांदोळी या सहा, पेडणे तालुक्यातील दोन वीज उपकेंद्रांना, तर डिचोली तालुक्यातील दोन उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. खुद्द दसरोत्सवाच्या दिवशी झालेल्या या बिघाडामुळे सुमारे दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची खूपच गैरसोय झाली.

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरेने प्रतत्न केल्‍याने माशेल व डिचोली येथील वीजकेंद्रांना फोंड्याहून वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे, डिचोली तालुक्याचा वीजपुरवठा सुमारे तासभरानंतर सुरळीत करणे शक्य झाले. तथापि, बार्देश व पेडणे तालुक्यातील वीजग्राहकांची दीर्घ काळ गैरसोय झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com