Goa Police: मुलगी शाळेत पोहचलीच नाही, गोवा पोलिसांची उडाली झोप; तपासात समोर आले धक्कादायक कारण...

शोधासाठी पोलिस पोहचले महाराष्ट्राच्या सीमेवर
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: गृहपाठ केला नाही म्हणून शाळेतील शिक्षा टाळण्यासाठी एक शाळकरी मुलगी शाळेत गेलीच नाही. पण तिच्या या कृत्यामुळे संपुर्ण गोवा पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. सर्वत्र शोध सुरू झाला.

शाळा सुटण्यास काही अवधी शिल्लक असताना संबंधित मुलगी शाळेत आली आणि हा शोध थांबला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ही मुलगी शाळेत न जाता दिवसभर म्हापसा बाजारपेठेत फिरत राहिली. संबंधित विद्यार्थिनी शाळेला आली नसल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी पालकांना कळवले. मुलीच्या पालकांनी लगेच पोलिसांत तक्रार अपहरणाची तक्रार दाखल केली.

Goa Police
सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील आरोपी कोकण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात; 2 महिन्यांपूर्वी दाखल झाली होती तक्रार

म्हापसा पोलिसांनीही तत्काळ 10 जणांची टीम तयार केली. तीन बचाव पथके तयार केली आणि शोध घ्यायला सुरवात केली. तसेच पणजी, कोकण रेल्वे, वास्को आणि कोलवाळ सह इतर पोलीस ठाण्यांना सतर्क केले.

इकडे पोलिसांची झोप उडाली असताना शाळा सुटण्यास काही मिनिटे बाकी असताना मुलगी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत परतली. शाळेजवळही पोलिसांचे एक पथक तैनात होते. मुलीला पाहून शिक्षक आणि पालकांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर पोलिसांनीही शोध मोहिम थांबवली.

Goa Police
सीआरझेड उल्लंघन प्रकरणी GCZMA कडून 104 जणांना दंड वसुलीच्या नोटीसा

शनिवारी हा प्रकार घडला. पेडेतील सेंट फ्रान्सिस झेवियर हायस्कूल येथे आठच्या सुमारास मुलीला पालकांनी शाळेबाहेर सोडले. पण ती कुणाला न सांगता म्हापसा मार्केटमध्ये पळून गेली. पोलिसांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि महाराष्ट्र सीमेवर व्यापक शोध घेतला.

दरम्यान, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. या मुलीने गृहपाठ पूर्ण केलेला नव्हता. त्यामुळे शिक्षेपासून बचाव व्हावा, यासाठी तिने शाळेला दांडी मारल्याचे मान्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com