तेजपाल प्रकरणात: गोवा खंडपीठाने बजावली नोटीस

TEJPAL.jpg
TEJPAL.jpg

पणजी: सहकारी महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक अत्याचार(harassment) प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने (Goa Bench) नोटीस बजावली असून त्याला उत्तर देण्यास 24 जूनपर्यंत मुदत दिली आहे. (In Tejpal case: Notice issued by Goa bench)

गोवा सरकारने (Government of Goa) तरुण तेजपाल याच्या निर्दोषत्वाला गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने निवाड्यात केलेल्या त्रुटी संदर्भात गोवा सरकारने 66 पानी दुरुस्ती अर्ज सादर करून 84 मुद्दे मांडले आहेत. आज या दुरुस्ती अर्जावर सुनावणी झाली असता याचिकेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे प्रथम दर्शनी विचारात घेण्यासारखे असल्याचे निरीक्षण या खंडपीठाने नोंदवले आहे. त्यामुळे पणजी  जिल्हा व सत्र न्यायालयातील या खटल्या सदर्भातचा दस्तावेज व खटल्यावरील प्रक्रियाची माहिती सादर करण्याचे निर्देश रजिस्ट्रीला खंडपीठाने दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com