गोव्यात लवकरच हेल्थ फॉर ऑल अंतर्गत टेली मेडिसिन सेवा: मुख्यमंत्री

गोवा सरकार (Government of Goa) राज्यातील तमाम नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.
गोव्यात लवकरच हेल्थ फॉर ऑल अंतर्गत टेली मेडिसिन सेवा: मुख्यमंत्री
TelemedicineDainik Gomantak

गोवा सरकार (Government of Goa) राज्यातील तमाम नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. हेल्थ फॉर ऑल (Health for all) अर्थात सर्वासाठी आरोग्य सेवा या अभियानांतर्गत लोकांना त्वरित आरोग्य सेवा मिळावी व डॉक्टरकडे येण्याची गरज पडू नये यासाठी टेली मेडिसीन (Telemedicine) सेवा लवकरच राज्यात सुरू केली जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आज दिली. पणजी मतदारसंघातील रायबंदर येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्र व वेलनेस सेवा केंद्राचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane), पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात (MLA Babush Monsera), आरोग्य खात्याचे इतर पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यातील नागरिकांना कोरोनाच्या काळात असो किंवा पुढील काळामध्ये असो इस्पितळांमध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये न येता घरबसल्या आरोग्य सल्ला देण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या संकल्पनेतून टेली मेडिसीन सेवा सुरू करण्याचे ठरले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले .

Telemedicine
गोवा विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी

काल गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पोस्ट कोविड विभाग सुरू करण्यात आलेला आहे .असे नव नवे उपक्रम आरोग्य खाते सुरू करत असून राज्यातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रायबंदर येथील आरोग्य केंद्र लवकरात लवकर व्हावे यासाठी स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी प्रयत्न केल्याचे सांगून येथील स्थानिकांची मागणी या आरोग्य केंद्रांमुळे पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्टेमी कार्डियाक आरोग्यसेवा 24 तास रायबंदर आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असून 108 रुग्णवाहिकाही 24 तास या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध होणार आहे. एक डॉक्टर, परिचारिका, पेरा मेडिकल स्टाप उपलब्ध असून परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

Telemedicine
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची दिल्लीवारी, शहांची घेतली भेट!

गोवा सर्व धर्म समभाव राज्य असून देशांमध्ये गोव्याचा नावलौकिक कधीही धार्मिक दंगा न झालेले राज्य असे आहे. सध्या काही धर्मांध शक्ती गोव्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून गोवेकरांनी सावध राहावे व गोव्याची एकता आणि अखंडता कायम ठेवावी . असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले. रायबंदर येथील चर्चच्या दीड कोटी खर्च करून गोवा पायाभूत विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व चर्चचे फादर फ्रान्सिस डायस उपस्थित होते. गोव्यात धार्मिक सलोखा आहे आणि तो कायम ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्चेचे सभागृह बांधण्यास घेतले होते ते पूर्ण होऊन लोकार्पण करण्याची संधी मला त्यांच्यामुळेच लाभली.असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले .

Related Stories

No stories found.