ऑनलाईनसाठी दूरदर्शन ठरू शकते वरदान

dd
dd

पणजी :

गेल्‍या अनेक दिवसांपासून ऑनलाईन शिक्षण हा चर्चेचा विषय झाला आहे. शिक्षकांकडून ऑनलाईन धडे घेतले जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभाग घेणे अनेक कारणांमुळे शक्‍य होत नाही. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी ऑनलाईन शिक्षण सक्‍तीचे नसल्‍याचे सांगितले, तरी आपण वर्गात सहभागी होऊ शकत नाही, ही भावना विद्यार्थ्यांच्‍या मनात ताण निर्माण करू शकते. काही विद्यार्थ्यांना नेटवर्क व्‍यवस्‍थित मिळत नसल्‍याने अभ्‍यासाच्‍या काळजीपोटी त्‍यांना रडू आवरत नाही. त्‍यासाठी सरकारने आता शिक्षणाच्‍या बाबतीत दूरदर्शनचे सहाय्‍य घेत शिक्षणाच्‍या बाबतीत प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचवावा.
केरळसारख्‍या राज्‍यात टीव्‍ही चॅनलच्‍या मदतीने हा प्रयोग करण्‍यात आला आहे. गोवा हे लहान राज्‍य आहे. तसेच पणजी दूरदर्शनची म्‍हादई वाहिनी आता उपग्रह संदेशवहन यत्रणेला जोडलेली आहे. दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत दूरदर्शनचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्‍यातही त्‍याच त्‍याच कार्यक्रमांचा समावेश असतो. ‘कोविड’ टाळेबंदीच्‍या काळात दूरदर्शनने प्रसारित होणारे स्‍थानिक कार्यक्रम थांबविले होते. पणजी दूरदर्शनच्‍या केंद्रात दोन सुसज्‍ज स्‍टुडिओ आहेत. यामुळे अभ्‍यासक्रम शिक्षकांकडूनच शूटिंग करून इयत्तेप्रमाणे वेळेचे आणि दिवसांचे नियोजन करून ते दूरदर्शनवर प्रसारित केले, तर हा प्रश्‍‍न सुटू शकतो. पणजी दूरदर्शन वाहिनी अद्याप काही तासच कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. तसेच खासगी डीटीएच सेवांद्वारे पणजी दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जात नाहीत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार, स्‍थानिक दूरदर्शनची वाहिनी खासगी डीटीएचवर दाखविणे बंधनकारक आहे. राज्‍य सरकार केंद्र सरकारच्‍या मदतीने या सक्‍तीची अंमलबजावणी करू शकते.

अशीही उपलब्‍ध होऊ
शकते कनेक्‍टिव्‍हीटी
काही दिवसांपूर्वी राज्‍यातील काही मंत्र्यांनी तसेच पक्षांच्‍या पदाधिकाऱ्यांनी आपल्‍या परिसरात मोफत ‘वायफाय’ सेवा देण्‍याबाबतची आश्‍‍वासने दिली होती. आता वेळ आली आहे, त्‍यांना त्‍यांच्‍या आश्‍‍वासनांची आठवण करून देण्‍याची. अशा प्रकारच्‍या सेवा त्‍यांनी उपलब्‍ध करून द्याव्‍यात. परिसरात ऑनलाईन कनेक्‍टिव्हिटी शक्‍य झाली, तर विद्यार्थी एकमेकांच्‍या घरी जाऊनही शिक्षणाचे धडे गिरवू शकतात. हा पर्यायही सद्यस्‍थितीतही विद्यार्थ्यांना तारू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com