Goa Winter Updates: राज्यात थंडीची चाहूल

गोव्यात आज मंगळवारचे तापमान 23 अंश से., दिवसाचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील
Goa Winter Updates
Goa Winter UpdatesSandip Desai

पणजी: बंगालच्या उपसागरात येऊ घातलेले जवाद वादळ (Jawad Cyclone) टळल्याने दिलासा मिळाला आहे. हे वादळ आले असते तर त्याचा परिणाम गोव्यावरही (Goa) अंशतः झाला असता. वादळ टळल्याने पाऊसही ओसरला आहे. दरम्यान, नेहमी 31 ते 32 अंशापर्यंत असणारे तापमान (temperature) सोमवारी किमान 27 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.

Goa Winter Updates
गोव्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव?

पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. पण, रविवारपासून राज्यात गारवा वाढला आहे. पारा घसरत असून यापुढील काळात राज्यात गुलाबी थंडी असेल, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. गोव्यात आज मंगळवारचे तापमान 23 अंश से., दिवसाचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Goa Winter Updates
गोव्याच्या नीलेशने दुबईत हरवले मृत्यूला

जवाद टळले, गारवा वाढला

अमावस्येच्या दिवशी समुद्राच्या पाण्याच्या पातळी वाढते. त्याला ‘जोरगत’ असेही म्हणतात. ही ‘जोरगत’ आल्याने पणजीतील खाडीचे पाणी मळा येथील उत्तर गोवा नगर नियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेरील असे साचून राहिले होते. मेरशी सर्कलजवळील रस्त्याच्या बाजूलाही जोरगत आल्याने असे पाणी साचत आहे. या पाण्यातून वाट काढताना सोमवारी वाहनचालकांना कसरत करावी लागली. पर्वरीहून अटल सेतूवरुन मेरशीकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नसल्याने असे पाणी साचून राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com