भाविकांसाठी आनंदाची बातमी; दक्षिण गोव्यात मंदिरे खुली

temples of south goa reopens in the state
temples of south goa reopens in the state

नावेली- दक्षिण गोव्यात अनेक मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली असली, तरीही भाविकांना कोरोना महामारीच्या संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन देवस्थान समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

खास करून दिवसा भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घ्यावे. रात्रीच्यावेळी पालखी सोहळ्यात व इतर धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाग घेऊ नये. मंदिरात प्रवेश करताना सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करावे. मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच लहान मुले व आपल्या घरातील ज्येष्ठांना शक्यतो मंदिरात सोबत आणण्याचे टाळावे, असे आवाहन काही देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
अनेक भाविक या नियमांचे पालन करीत असल्याने मंदिरात भाविकांना दर्शन घेणे सोयीचे वाटत आहे.

श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण देवस्थान समितीचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी सांगितले, की आम्ही भाविकांसाठी मंदिर खुले केले असले तरी सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात भाविकांनी दिवसभरात सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करून दर्शन घ्यावे, रात्री देवस्थान समिती, महाजन व देवस्थानचे वांगडी रात्री मखरोत्सव साजरा करणार असून यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाऊ नये, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलखुश देसाई यांनी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून भाविकांना सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सॅनिटायझरचा वापर करून तसेच मास्क घालून मंदिरात प्रवेश करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com