गोव्यात दहा वर्षांची परंपरा कायम; हूनर हाटमध्ये हस्तकला, पाककृती आणि संस्कृतीचा संगम

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

कला आणि संस्कृतीचा संगम असलेल्या हूनर हाटने भारतीय संस्कृतीचा प्रदर्शन मांडले आहे.

पणजी: कला आणि संस्कृतीचा संगम असलेल्या हूनर हाटने भारतीय संस्कृतीचा प्रदर्शन मांडले आहे. आजपासून येथील कला अकादमीत हस्तकला साहित्याचे प्रदर्शन सुरू होत आहे. उदघटनापूर्वीच या प्रदर्शनाला गोयकरांची गर्दी होत आहे. 

काय नाही या प्रदर्शनात? लाकूड, माती यापासून बनविलेल्या विविध वस्तू, हातावर विणलेले कपडे, दागिने, गृहपयोगी साहित्य, मुर्त्या आणि बरच काही या प्रदर्शनात आहे. देशातील प्रत्येक राज्यातून किमान दोन हस्तकाला कारागिर त्यांची कला सादर करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यात तामिळनाडूचा पारंपरिक बाज असलेली कांचीवरम आहे, राजस्थानी जुटी आहे. बनारसी कपडे आहेत, तसेच आंध्रतून आलेले शाकाहारी पेंटिंगचे कपडेही आहेत. (The ten year tradition continues in Goa A confluence of handicrafts cuisine and culture at the Hunar Hat)

कोल्हापुरी चप्पलपासून ते मध्यप्रदेशातील लाकडी खेळणीही आहेत. कोलकात्याचे सी शेल साहित्य जसे लक्षवेधी आहे तसेच नागालँडचे ड्राय फ्लॉवर्सदेखील नागरिकांना स्वतःकडे खेचत आहेत. दिल्लीच्या निधी हिचे थ्री डी पेंटिंग बघण्यासाठी तर गर्दी उसळत आहे. अजंठा गुहेतील मूर्त्यांचे मिर्झा जलील बेग हसन यांनी रेखाटलेली चित्रे तर अफलातून आहेत.

उच्च न्यायालयाच्या इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे...

बिहारच्या नाविता झा यांनी खादी आणि गावतापासून बनविलेल्या गृहपयोगी वस्तू तर लक्षवेधी आहेतच, शिवाय आग्रा येथील आरिफ कुरेशी यांचे मार्बल मूर्त्यांचा स्टॉल गर्दी खेचत आहे.  कुंभरिका कलेने तर प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना खिळवून ठेवले आहे. एकंदर, या प्रदर्शनात भारतीय परंपरेचे प्रतीक अधोरेखित होत आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात येत आहे. येथे जेवढा चांगला प्रतिसाद मिळतो, तितका क्वचितच दुसरीकडे मिळतो.दरवर्षीच्या तुलनेत यंदा गर्मी खूप आहे. तरीही लोक प्रदर्शन पाहायला येतात, हे गोव्यातच घडते. 

संबंधित बातम्या