Goa: वाढते गुन्हे! परप्रांतीय भाडेकरू पुन्हा रडारवर, 'लाला की बस्ती' येथील सात जणांवर गुन्हा

जवळपास 60 भाडेकरुंनी माहिती पोलिसांकडे नोंद केली नव्हती.
Lala ki Basti
Lala ki Basti Dainik Gomantak

गोव्यात वाढती गुन्हेगारी आणि त्यात परप्रांतीयांचा असलेला सहभाग यावरून गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोलवाळ पोलिसांनी थिवीतील ‘लाला की बस्ती’मध्ये भाडेकरु पडताळणी मोहीम राबविली असता जवळपास 60 भाडेकरुंनी माहिती पोलिसांकडे नोंद केली नव्हती. एकूण पाच पोलिसांची पथके तयार करुन ही तपासणी करण्यात आली. त्यानंतर या संबंधितांना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. यातील सात जणांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

Lala ki Basti
TMC Goa: भाजपचा देश सुरक्षेचा दावा फोल, गोव्याची सागरीसुरक्षा धोक्यात; TMC चा आरोप

राज्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये परप्रांतीयांचा अधिक सहभाग असल्याचे समोर आले आहे. अनेकदा घरमालक स्थानिक पोलिस स्थानकात भाडेकरुंची माहिती जमा करीत नसतात. आणि यातील काही भाडेकरुंचा नंतर कथित गुन्ह्यांमध्ये सहभाग असतो. याची खबरदारी घेत सध्या गोवा पोलिसांकडून भाडेकरु पडताळणी मोहीम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.03) सकाळी कोलवाळ पोलिसांनी औचितवाडा-थिवी जी ‘लाला की बस्ती’ म्हणून ओळखली जाते तिथे ही भाडेकरु मोहीम राबविली.

यावेळी 50 ते 60 जणांनी भाडेकरु पडताळणी अर्ज भरलेला नव्हता. ज्यामध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील लोकांचा सहभाग होता. या संबंधितांना पोलिस स्थानकात आणून सर्वांकडून पोलिसांनी भाडेकरु पडताळणी अर्ज भरुन घेतला.

ज्याचप्रमाणे संबंधित घरमालक, हॉटेल-गेस्ट हाऊस मालक, कंत्राटदारांना आपल्या कर्मचार्‍यांचा भाडेकरु पडताळणी अर्ज येत्या 24 तासांत भरुन देण्याचे निर्देश सुद्धा पोलिसांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार नाईक व इतर पोलीस कर्मचार्‍यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Lala ki Basti
St Francis Xavier Feast: गोयंचा साहेब! प्रेम आणि एकोप्याचे प्रतीक जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त

"आजची भाडेकरु पडताळणी मोहीम ही लोकांमध्ये जागृतीसाठीच होती. जेणेकरुन भविष्यात एखादा गुन्हा घडल्यास या पडताळणी अर्जांमधून संशयित गुन्हेगार पकडण्यास मदत मिळू शकते. कारण काहीजण हे अशा स्थलांतरित वस्त्यांमध्ये आश्रय घेतात. तसेच अनेकदा संशयित हे स्थलांतरित असल्याची काही प्रकरणांतून समोर आले आहे." असे कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com