Margao News: मासळी विक्रेत्यांवर पोलिस बळाचा वापर; मडगावात तणाव

Margao News: दिगंबर कामतांची मध्यस्थी. विक्रेते जाब विचारण्‍यासाठी एसजीपीडीए कार्यालयात आले असता, सदस्‍य सचिवांनी त्‍यांना भेटणे टाळल्‍याने ते अधिकच प्रक्षुब्‍ध बनले
Margao Fish wholesale market
Margao Fish wholesale marketDainik Gomantak

Margao Fish Wholesale Market: उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या एका आदेशानुसार आज (गुरुवारी) सकाळी ‘एसजीपीडीए’च्‍या होलसेल मार्केटसमोर बसणाऱ्या मासळी विक्रेत्‍यांना पोलिस बळाचा वापर करून हटविल्‍याने वातावरण तंग झाले.

हे विक्रेते जाब विचारण्‍यासाठी एसजीपीडीए कार्यालयात आले असता, सदस्‍य सचिवांनी त्‍यांना भेटणे टाळल्‍याने ते अधिकच प्रक्षुब्‍ध बनले. शेवटी दुपारी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मार्केटमध्ये येऊन मध्‍यस्‍थी केल्‍यानंतर वातावरण निवळले.

Margao Fish wholesale market
NIA Raid In Goa: उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोटाचा कट; गोव्यातील 10वीच्या विद्यार्थ्याची ‘एनआयए’कडून चौकशी

‘एसजीपीडीए’च्‍या होलसेल मासळी मार्केटबाहेर मासळी विकल्यानंतर माशांचे उर्वरित अवशेष लगतच्या शेतात टाकले जातात.

त्‍यामुळे जलस्रोत दूषित होते, असा दावा करणारी एक याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात दाखल झाल्‍यानंतर येथे स्वच्छतेसाठी ‘एसजीपीडीए’ने उपाययोजना करावी, असा आदेश न्‍यायालयाने दिल्‍यानंतर आज सकाळी या मासे विक्रेत्‍यांना हटविण्‍यात आले.

गुरुवारी दुपारी ३ वाजता आमदार दिगंबर कामत आणि एसजीपीडीएचे अध्‍यक्ष दाजी साळकर यांनी त्‍या महिलांची भेट घेतली. यावेळी कामत यांनी त्‍या महिलांना पार्किंग करण्‍याच्‍या जागेत बसा, अशी सूचना देत या समस्‍येवर तोडगा काढण्‍याचा प्रयत्‍न केला.

मात्र, ही कारवाई उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर केल्याने कायदेशीर सल्‍ला घेऊन पुढील निर्णय घेेऊ, असे साळकर म्हणाले.

सध्‍या एसजीपीडीए नवीन मार्केट बांधत असल्‍यामुळे आम्‍हाला नाईलाजाने बाहेर मासे विक्री करावी लागते. आमचा त्रास होत असेल तर मासे विकण्‍यासाठी दुसरी जागा द्यावी. सं १० नंतर मासे विकण्‍यास निर्बंध आणतात.

मात्र, रापणीचे मासे उशिरा पकडले जात असल्‍यामुळे ते १० पर्यंत विक्री करायला भाग पाडणे हे अन्‍याय्य असल्‍याचा दावा या महिलांनी केला. रस्‍त्‍यालगत लमाणी महिला मासे विकतात, त्‍यांच्‍यावर पोलिस कारवाई करत नाहीत. आमच्‍यावर, कारवाई करतात, असा त्‍यांचा आरोप होता.

सचिवांचे मौन

कारवाई झाल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात महिला विक्रेत्या जमल्या. अचानक झालेल्‍या कारवाईमुळे त्‍या प्रक्षुब्‍ध झाल्‍याने वातावरण तंग झाले.

न्‍यायालयाचा आदेेश असेल तर दाखवा, अशी मागणी करत या महिला एसजीपीडीए कार्यालयात गेल्‍या. तेथे त्‍यांनी सदस्‍य सचिवांची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, सचिवांनी त्‍यांच्‍याशी बाेलणे टाळले.

Margao Fish wholesale market
CM Pramod Sawant: महागाई वाढल्‍यास पेन्‍शनही वाढणार : मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com