तेरेखोलवासी सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य सरकारवर अवलंबून

उत्तर गोव्याचे मस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडणे तालुक्यात गोव्यातून नाही तर महाराष्ट्रातून सोयी पुरवल्या जातात
Terekhol people depend on Sindhudurg Maharashtra State Government for basic needs
Terekhol people depend on Sindhudurg Maharashtra State Government for basic needsDainik Gomantak

उत्तर गोव्याचे (North Goa) मस्तक म्हणून पेडणे (Pernem) तालुका ओळखला जातो. याच पेडणे तालुक्यात तेरेखोल नदी पलीकडे तेरेखोल वासीयांना ये-जा करण्यासाठी गोवा मुक्त होवून अर्धे शतक उलटले तरीही बेभरावश्या फेरीबोट सेवेवरच अवलंबून राहावे लागते. आज पर्यंत पाणी (Water) वीज (Electricity) या मुलभूत सेवा राज्य सरकार पुरवण्यासाठी अपयशी ठरला आहे, त्यामुळे या महत्वाच्या सेवेसाठी शेजारच्या सिंधुदुर्ग महाराष्ट्र (Sindhudurg Maharashtra) राज्य सरकारवर या तेरेखोलवासियांना अवलंबून रहावे लागते.

Terekhol people depend on Sindhudurg Maharashtra State Government for basic needs
गोव्यातील ‘संजीवनी’ची साखर कडू

याची गंभीर दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी या नदीवर 75 कोटी रुपये खर्च करून पूल उभारण्यासाठी पायाभरणी केली होती . केरीच्या बाजूने पुलाचे काम पूर्ण झाले मात्र तेरेखोल नदीतील खांब घालण्यासाठी प्रयत्न झाला . त्यावेळी या पुलावरून जो तो उठून राजकारण करू लागला . पूल बांधताना पर्यावरण दाखला घेतला नसल्याचा दावा करत गोवा फौंडेशन संस्थेने हरिद लवादाकडे याचिका दाखल केल्याने या कामाला स्थगिती मिळाली . गेल्यावर्षी हरिद लवादाकडून या पुलाला हिरवा कंदील मिळाला आहे.

Terekhol people depend on Sindhudurg Maharashtra State Government for basic needs
मुख्यमंत्री सावंतांचा स्वार्थासाठी साखळी पालिकेत हस्तक्षेप

त्यामुळे भविष्यात या पुलाचे काम होणार आहे. मात्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला तर पुलाचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे . पेडणे तालुक्यातील केरी तेरेखोल पंचायत क्षेत्राचा एक तेरेखोल प्रभाग हा तेरेखोल नदीच्या पलीकडे असल्याने तेरेखोल भाग हा राज्याचा कि महारास्ट्र राज्याचा असा कधी कधी प्रश्न पडतो. कारण गोवा मुक्त होवून अर्धे शतक उलटले तरीही या तेरेखोलवासियाना आजपर्यंत गोव्यातून वीज, शिक्षण, पाणी, आरोग्य सेवा याचा पुरवठा होत नाही. त्यांना महाराष्ट्र भागातून सोयी पुरवल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com