मगोविरुद्ध ‘मामा- भाच्या’ला हाताशी धरून खेळली खेळी

  The term of the Central Committee of the Maharashtrawadi Gomantak Party has expired
The term of the Central Committee of the Maharashtrawadi Gomantak Party has expired

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर अविश्वास ठराव बजावणाऱ्या २६ जणांपैकी एकही मगोचा सदस्य हा मतदानाचा अधिकार असलेला नाही. यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर मगोला बदनाम करण्यासाठी ‘मामा- भाच्या’ला हाताशी धरून खेळलेली ही खेळी होती, हे आता उघड होऊ लागले आहे.


मगोच्या नेत्यांनी ही नोटीस मिळाल्यावर या मागे कोणाची खेळू असू शकेल, यावर विचार सुरू केला. माजी पदाधिकारी असलेल्या ‘भाच्‍या’च्‍या डोक्यातून ही सुपिक कल्पना जन्मली आणि ‘मामा’ने त्याची अंमलबजावणी केली, अशी खात्रीलायक माहिती मगोच्या नेत्यांच्या हाती आली. त्यामुळे हे करण्यामागे नेमके कोण असावेत, याचा शोध घेणे त्यांनी सुरू केले. यात गोवा फॉरवर्ड आणि भाजपशी संबंध असलेले काही नेते असावेत, असा संशय त्यांना आला आहे. मात्र, योग्यवेळीच यावर बोलू अशी सावध भूमिका मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी घेतली आहे.

ड्‍यंत्र कदापि यशस्वी होणार नाही
यामागे कोण असावा असे विचारल्यावर ते म्हणाले, हे कोणाचे कारस्थान आहे याची माहिती मी पत्रकार परिषद घेऊन योग्यवेळी उघड करणार आहे. तूर्त ‘मामा -भाच्या’चे हे कारस्थान आहे एवढेच सांगेन. आमच्या समितीची मुदत २०१७ मध्ये संपली होती. मी उपस्थित नसताना पदाधिकाऱ्यांनी आमसभा बोलावून समितीला दोन वर्षे मुदत वाढवून दिली. ती डिसेंबर २०१९ मध्ये संपली. यंदा जानेवारीत आमसभा आणि निवडणूक होणार होती. मात्र, जिल्हा पंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ती घेता आली नाही. नंतर कोविड हामारी आली. 


आमसभा व निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती त्यांनी केवळ शंभर जणांच्या उपस्थितीत आमसभा घ्या, असे सूचवले. एक हजार जणांची आमसभा केवळ शंभर जणांच्या उपस्थितीत कशी घ्यावी, हा प्रश्न होता म्हणून आमसभा घेतली नाही. निवडणूक आयोगाला आम्ही ही सारी कल्पना दिली आहे आणि आयोगाने फेब्रुवारी २०२१ पर्यंत निवडणूक घेण्यास मोकळीक दिली आहे.


पक्षात कोणताही गैरव्‍यवहार नाही, लेखापरीक्षण झालेले आहे. सर्व अहवाल तयार आहेत. ते आमसभेत मांडले जातील, असे सांगून ते म्हणाले, पक्षबाह्य शक्तींना मगोला संपवायचा आहे. स्थानिक पक्ष मगो संपला की काहींना त्यांचे राजकारण चांगले चालेल, असे वाटते. काही राष्‍ट्रीय पक्षातील नेत्यांचीही त्यांना साथ लाभत आहेत. मगोविरोधात त्यांची एकी असते. मगो अशा डावपेचांना बळी पडणारा पक्ष नाही. तो या साऱ्यांना पुरुन उरेल. मगोला संपवण्याचे हे षडयंत्र कदापि यशस्वी होणार नाही असे त्यांनी 
सांगितले. जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या वेळी सोशल मीडियावर याबाबत वृत्त व्‍हायरल झाले होते. त्‍यामुळे लोकांमध्‍ये  संभ्रम निर्माण झाला होता. वृत्तपत्रांतही याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते.


‘त्‍या’पैकी एकालाही मतदानाचा अधिकार नाही
या अविश्वास ठरावाबाबत ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, मगोच्या घटनेनुसार प्रत्येक मतदारसंघातून तीस जणांना आमसभेमध्ये मतदानाचा अधिकार असतो. मगोच्या कार्यालयात पाठवलेल्या अविश्वास ठरावावर सही केलेल्या एकाही व्यक्तीस असा मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या अविश्वास ठरावास तसा अर्थ राहत नाही. मगोच्या समितीची मुदत संपलेली असल्याने आणि नव्याने निवडणूक होणार असल्याने अविश्वास ठराव हा केवळ प्रसिद्धीचा फार्स म्हणावा लागेल. त्याचमुळे गुपचूप अशी नोटीस पाठवून ती जिल्हा पंचायतीच्या तोंडावर प्रसार माध्यमांना मिळण्याची व्‍यवस्था करणाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलावे, असे आव्हान मी दिले. मात्र अद्याप ते कोणी स्वीकारलेले नाही.

मगोला संपवण्याचे प्रयत्न इतर पक्षांतून सुरू आहेत. अविश्वास ठरावाची नोटीस हा त्याच खेळीचा एक 
भाग आहे. मगोच्या केंद्रीय समितीची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या समितीवर अविश्र्वास ठरावाची नोटीस बजावून प्रसिद्धीपलीकडे काहीही साध्‍य होणार नाही.
- दीपक ढवळीकर, अध्यक्ष मगो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com