झुआरीनगरमधून दाबोळीकडे निघालेल्या दुचाकीचा भीषण अपघात

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

झुआरीनगर मधून  दाबोळीकडे निघालेल्या एक दुचकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

वास्को : झुआरीनगर मधून  दाबोळीकडे निघालेल्या एक दुचकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात  या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार ठार झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. दाबोळीतिल  नौदलाच्या एनएसडीसमोरच्या वाहतूक बेटाला ही दुचाकी धडकल्याने हा अपघाड घडला.  या अपघातप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केला. (Terrible accident of a two-wheeler going from Zuarinagar to Daboli)

गोवा : काॅंग्रेस संपवण्याचा कामत आणि रेजिनाल्ड यांचा डाव

अपघातग्रस्त प्रकाश कुमार आणि बबलू सुमन हे मूळचे बिहार होते. नोकरीनिमित्त ते दाबोळीत वास्तव्य करत होते.  एका खाजगी कंपनीमध्ये ते दोघेही काम करीत होते. काम आटोपून ते शनिवारी मध्यरात्री दीड वाजता झुआरीनगर येथून दाबोळीकडे घराकडे निघाले असताना वाहतूक बेटाला त्यांची दुचाकी धडकली. हा अपघात इतका भीषण होता की स्कूटीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. 

Margao municipal elections : मडगावात 98 उमेदवार रिंगणात 

या अपघातात 35 वर्षांचे प्रकाश कुमार हा जागीच ठार  झाला असून दुसरा युवक बबलू सुमन हा गंभीर जखमी झाला.  त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  
 

संबंधित बातम्या