वेळळी पोलिसांना झालेल्या मारहाण प्रकरणी निरीक्षकाची साक्ष!

वेळळी येथे चर्चच्या आवारात पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांची साक्ष.
वेळळी पोलिसांना झालेल्या मारहाण प्रकरणी निरीक्षकाची साक्ष!
Police stationDainik Gomantak

सासष्टी : वेळळी येथे चर्चच्या (Church) आवारात पोलिसांना मारहाण (Police beaten) केल्याप्रकरणी सोमवारी मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात (In court) झालेल्या सुनावणीत सीआयडी विभागाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक तथा फातोर्डा पोलिस ठाण्याचे (Police station) पोलिस निरीक्षक कपिल नायक यांची साक्ष न्यायालयाने नोंद केली.

2012 साली विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे वेळ्ळीत निर्णय घेण्यात आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला वेळळीतील घटनेची परिस्थिती जाणून घेण्याची सूचना दिली. रात्री 8.30 वाजता चर्च आवारात पोचल्यानंतर पोलिसांनी चर्चच्या धर्मगुरूना भेटून माहिती घेण्याचे ठरविले.

Police station
गोवा सुराज्य पक्षाच्या तिकीटावर ‘आरजी’चे उमेदवार निवडणूक लढतील ; मनोज परब

त्यानुसार आम्ही अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह जाऊन दरवाजा उघडण्यासाठी धर्मगुरूच्या खोलीचे दार ठोठावले. एका चर्च समिती सदस्यांना चर्चची बेल वाजवून सुमारे 1500 लोकांची गर्दी गोळा केली. गर्दीतून वाट काढत असता, एका व्यक्तीने हातातील घड्याळ आणि मोबाईल हिसकवून घेतला आणि दोन धर्मगुरूसह लोकांनी पोलिसांना मारहाण केली. वेळीच पोलिस पथक घटनास्थळी पोहचल्याने यातून काहींना वाचविले आणि हॉस्पिसीओ तर त्यानंतर व्हीक्टर इस्पितळात हलविले, असे नायक यांनी साक्ष देताना न्यायालयाला सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी वेळळी चर्चच्या आवारात काही माहिती मिळविण्यासाठी आलेल्या पोलिसांवर लोकांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात फा. रोमानियो गोन्साल्विस यांच्यासह एकूण 22 जणांवर कुंकळ्ळी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.

या हल्ल्यात सीआयडी विभागाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कपिल नायक, हवालदार कृष्णानंद राणे व पोलीस शिपाई कुलदीप देसाई हे जखमी झाले होते. या प्रकरणी दोन धर्मगुरुसह अन्य 22 जणांवर न्यायालयाद्वारे आरोप निश्चिती करण्यात आली असून, संशयितावर भादंसंच्या 143, 144, 147, 148, 149, 186, 323, 324, 332, 333, 341, 342 व 353 कलमाखाली आरोप निश्चित केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com