त्यामुळेच मगोने काँग्रेस, भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले : सुदिन ढवळीकर

काँग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) राजकारणात जी बजबजपुरी माजवली आहे, त्यामुळेच मगोने या दोघांशीही संबंध तोडले, असे स्पष्टीकरण मगोचे नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिले.
त्यामुळेच मगोने काँग्रेस, भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले : सुदिन ढवळीकर
सुदिन ढवळीकरDainik Gomantak

Assembly Election 2022: 'मगो पक्ष हा गोमंतकीयांच्या मनातील आणि ह्लदयातील पक्ष आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी कार्यरत मगो (MGP) पक्षाने यावेळेला तृणमूल काँग्रेसशी (TMC) युती केली, ती कार्यकर्ते आणि मतदारांच्या विश्‍वासाच्या बळावरच. तृणमूलची ध्येयधोरणे आणि कार्य पाहूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही अफवांना बळी पडू नये', असे आवाहन करताना काँग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) राजकारणात जी बजबजपुरी माजवली आहे, त्यामुळेच मगोने या दोघांशीही संबंध तोडले, असे स्पष्टीकरण मगोचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिले.

सुदिन ढवळीकर
गोव्याच्या शिक्षण कर्मचार्‍यांची विनंती हायकोर्टाने फेटाळली

मडकई मतदारसंघातील मगो पक्षाच्या प्रचाराला आज प्रारंभ झाला. यावेळी बांदोडा येथील देवी महालक्ष्मीला श्रीफळ ठेवून तसेच देवी नवदुर्गा, आम्रेकरनाथ व कटमगाळदादाचे आशीर्वाद घेऊन सुदिन ढवळीकर यांनी प्रचाराला धडाक्यात प्रारंभ केला. यावेळी मडकई मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच सदस्य व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर
...त्यामुळे कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षांची सभा पोलिसांनी केली बंद

ढवळीकर म्हणाले, की मगोने काँग्रेस, भाजपला गोव्याच्या राजकारणात आणले, पण या दोन्ही पक्षांनी मगोला संपवण्याचा प्रयत्न केला. मगोची समृद्धी आजच्या बजबजपुरीमुळे डागाळली असून यापुढे मगो-तृणमूल युती गोव्याच्या हितासाठी कार्य करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com