CM Pramod Sawant: खंडणीबाबतचे 'ते' पत्र व्हिएतनाममधून; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा प्रयत्न

गुन्हे शाखेच्या तपासात माहिती उघड
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्यातील क्लब आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून खंडणी उकळल्याच्या आरोपांबाबपत सोशल मीडियात व्हायरल झालेले पत्राच्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास केला आहे. पोलिसांच्या चौकशीत, संबंधित तक्रार व्हिएतनाम मधील मोबाईल फोनवरून आल्याचे उघड झाले आहे. (Fake Complaint of Extortion)

या तक्रारीत सात अपात्र सह्यांव्यतिरिक्त तक्रारदारांची नावे नाहीत. ही तक्रार व्हिएतनाममधील मोबाईल क्रमांक +84 334364121 वरून व्हॉट्सअॅपद्वारे आली होती. त्यावरून 16 मार्च रोजी ती वेगवेगळ्या नंबरवर पाठवण्यात आली होती. तथापि, तक्रारीत नावे येऊ शकली नाहीत.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: आगामी दोन वर्षात राजधानी पणजी सोलर सिटी बनवणार

दरम्यान, दोन व्यक्तींनी स्वतंत्रपणे याबाबतची तक्रार पोलिसांत दिली होती. गोपाल कुचडकर याांनी पर्वरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली आणि साहिल अडवलपालकर यांनी पणजी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांना +84334367121 क्रमांकाद्वारे बनावट पत्र पाठवले गेले होते.

आणि त्यातील स्वाक्षरींची बारकाईने तपासणी केली असता त्यांची आडनावे वापरली गेली होती. तक्रारदार नाईट क्लबचे मालक असल्याने त्यांना याबाबत बनावटगिरीचा गुन्हा नोंदवायचा होता. गोवा राज्य, गोवा सरकार आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी हे पत्र पाठवले गेल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

CM Pramod Sawant
Goa Drugs Case: फोंडा येथे 2 किलो गांजासह एकाला अटक

दरम्यान, तक्रारीवरून इतर नावे स्पष्ट होऊ शकली नाहीत. हा क्रमांक व्हिएतनामचा असून पोलिसांचे सायबर क्राईम युनिट तक्रारीचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम करत आहे. तक्रार टोपणनावाने असल्याने तक्रारीची सत्यता पडताळता आलेली नाही.

तक्रारीचे मूळ व्हिएतनाम येथील असून तक्रारकर्त्यांचा शोध लागलेला नाही. हे पत्र काही सायबर गुन्हेगारांनी किंवा असंतुष्ट लोकांनी गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसृत केले आहे, असे दिसते.

मुख्यमंत्र्यांनी याबाबत यापुर्वीच चौकशीचे आदेश दिले होते. पोलिस महानिरीक्षकांनी या पत्राची सत्यता तपासावी. ज्यांची नावे आहेत, त्यांची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. माझे प्रशासन स्वच्छ आहे. असले प्रकार सहन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com