अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे; युवा समितीकडून स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आप सत्तेवर आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. त्यांची ही घोषणा समाजाची मते मिळवून फायदा घेण्यासाठी ती असू शकते.
अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे; युवा समितीकडून स्पष्टीकरण
अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे; युवा समितीकडून स्पष्टीकरणDainik Gomantak

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष भंडारी समाजाच्या नेत्यांना अधिकाधिक उमेदवारी देईल त्या पक्षाला समाजाचा पाठिंबा असेल असे विधान समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केले होते ते समाजाच्या हितासाठी होते. त्या विधानाचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हता. कोणत्याही नेत्याने समाजाच्या समितीशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली तर समाज राजकीय पक्षांना पाठिंबा देतो असे होत नाही, असे स्पष्टीकरण समाजाच्या युवा समितीने केले.

अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे;
युवा समितीकडून स्पष्टीकरण
राजकीय वक्तव्ये केल्याने भंडारी समाजामध्ये संतापाची लाट

पणजीतील समाजाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे अध्यक्ष सुप्रज तारी यांनी सांगितले की, समाजाचे नेते व माजी मंत्री महादेव नाईक यांनी ‘आप’चे मुख्यमंत्री समाजाच्या कार्यकारी समितीला भेटण्यास उत्सुक असल्याचे कळविले त्यानुसार या समाजाच्या अध्यक्षांनी त्याला होकार कळविला होता. त्यानंतर आपचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आप सत्तेवर आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा केली. त्यांची ही घोषणा समाजाची मते मिळवून फायदा घेण्यासाठी ती असू शकते. त्यांनी केलेली ती घोषणा हे त्यांचे वैयक्तिक विचार असून त्यावर समाज बंधन घालू शकत नाही.

अध्यक्षांचे ‘ते’ विधान भंडारी समाजहिताचे;
युवा समितीकडून स्पष्टीकरण
गोव्यात भंडारी समाजाचे राजकारण करायला नाही तर त्यांचा हक्क मिळवून द्यायला आलोय

विचार मांडण्याचा अधिकार

गोमंतक भंडारी समाज विकासात मागे राहिला आहे. त्यासाठी जर या समाजासाठी काही राजकीय पक्षाचे नेते या समाजाच्या समस्या तसेच प्रश्‍न ऐकून ते सोडवण्यास पुढे येत असल्यास व त्यांच्या जाहीरनाम्यात या समाजासाठी विविध योजना आखणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. जर हे राजकीय पक्ष समाजाला गृहित धरून स्वतःची मते वाढवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा समाज ते बंद करू शकत नाही. राजकीय पक्षांना विचार मांडण्याचा घटनेत अधिकार आहे, असे तारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com