Vasco : आमचा छळ थांबवावा; मुरगाव पालिकेच्या कारवाईवरुन भाजी विक्रेते संतापले

भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी मुरगाव मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
Vasco vendors
Vasco vendors Dainik Gomantak

वास्को: वास्को येथील नवीन भाजी मार्केटच्या दुतर्फा सीमांकन न करता मुरगाव पालिकेने तेथील विक्रेत्यांवर कारवाई केली. ही कारवाई म्हणजे हुकूमशाही, मनमानी व नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा नवीन भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

( The action taken against the vegetable vendors in Vasco by Murgaon Municipality is a violation of justice says vendors )

मुरगाव पालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा पुनर्विचार करून आमचा छळ थांबवावा, नगरपालिका कायदा 1968 मधील नियमांचा अवलंब करावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. पालेभाज्या नाशवंत असल्याने त्यांना हवा लागणे आवश्यक आहे. त्यामुळे पालेभाजी आमचे दुकान व रस्त्यामध्ये एक मीटर जागा सोडावी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. या निवेदनावर सुमारे शंभर विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Vasco vendors
Goa Rain Update : येत्या दोन दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

वास्को येथील नवीन भाजी मार्केटातील विक्रेते रस्त्याकडेला आपला व्यवसाय करतात. त्यांनी तेथे आपल्या सोयीनुसार दुकाने उभारली आहेत. मात्र दुकानात उभे राहून मालविक्री करण्याऐवजी ते दुकानाबाहेर तसेच समोरच्या रस्त्यावर अतिक्रमण करून मालविक्री करतात. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्ता अडवल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात. तेथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यापूर्वी मुरगाव पालिकेने विक्रेत्यांना नोटीस दिली होती.

अन् नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मुरगाव पालिकेने दणका दिला. तेथील अतिक्रमणे हटविताना काहीजणांचे साहित्य जप्त करण्यात आले. तुम्ही दुकानाच्या बाहेर साहित्य मांडू नका, रस्त्यावर अतिक्रमण न करता व्यवसाय करा, असे विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले. परंतु आम्ही आतापर्यंत पालिकेला सतत सहकार्य केल्याचे सांगत त्या विक्रेत्यांनी आता मुरगाव पालिकेलाच कायद्याची भाषा शिकविण्यास आरंभ केला आहे.

Vasco vendors
Goa Tourism: गोव्याचे पर्यटन म्हणजे फक्त किनारे, सीफूड नव्हे तर...

विक्रेत्यांनी पालिकेला निवेदन देऊन कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आवाहन केले आहे. गोवा नगरपालिका कायदा 1986 च्या कलम 169 नुसार सार्वजनिक रस्ते कोणते आहेत हे जनतेला कळण्यासाठी सूचना फलक लावण्याची गरज आहे. 178 कलमानुसार प्रत्येक सार्वजनिक रस्त्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे. परंतु मुरगाव पालिकेने ते केलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट असल्या निवेदनात म्हटले आहे.

नवीन भाजी मार्केटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीमांकन रेषा करण्याची गरज होती. मुरगाव पालिकेने रेषा आखून दिल्यास आम्ही त्या रेषेच्या बाहेर जाणार नाही. विक्रेते बाहेर विक्री करतील त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची गरज काही विक्रेत्यांनी केली आहे. काही विक्रेते अतिक्रमण करतात या दाव्याला काही जुन्या विक्रेत्यांनी दुजोरा दिला आहे. पालेभाजीला वारा लागला नाही तर ती खराब होते, असे सांगणारे काही विक्रेते रस्त्यावर लिंबू, कांदे, बटाटे, नारळ, इतर भाजी, फळे वगैरे विकतात. त्यासंबंधी ते काहीच बोलत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com