Anti IIT Protest in Sanguem: सांगेतील ‘आयआयटी’विरोधी आंदोलनाला 42 दिवस पूर्ण

शेतकऱ्यांचा ठाम निर्धार; आमदारांच्या जाहीरनाम्यात आयआयटी शब्द नसल्याचा संजय मापारी यांची टीका
Protest in Panjim against IIT Goa Sanguem
Protest in Panjim against IIT Goa Sanguem Dainik Gomantak

(Anti IIT Protest in Sanguem) सांगे : शेतकऱ्यांच्या ‘आयआयटी’ विरोधातील धरणे-आंदोलनास 42 दिवस पूर्ण झाले. या आंदोलकांना विविध स्तरावरील संघटना, संस्था, राजकीय पक्ष, नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या जमिनी जाणार म्हणून आमचा विरोध आहे, हा प्रकल्प इतर ठिकाणी उभारावा, अशी मागणी जोसेफ फर्नांडिस यांनी केली.

Protest in Panjim against IIT Goa Sanguem
Non Veg Food in Goa : गोव्यात शाकाहारापेक्षा मांसाहार स्वस्त!

आंदोलक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना फर्नांडिस म्हणाले, प्रकल्प चांगला आहे, तर लोलये, सांगे, शेळ-मेळावली येथील लोकांना आणि त्या आमदारांना का नकोसा झाला? याची कारणे शोधून काढली पाहिजे. प्रकल्पातून रोजगार आणि नोकऱ्या मिळत असल्यास त्यासुद्धा लोलये आणि मेळावलीवासियांनी का नाकारल्या? याचे उत्तर मिळाले पाहिजे.

संजय मापारी म्हणाले, आमदार जरी त्यांच्या जाहीरनाम्यात आयआयटी विषय होता, म्हणूनच लोकांनी आपल्याला निवडून दिले, असे वारंवार सांगत असले, तरी त्यांच्या जाहीरनाम्यात आयआयटी नावाचा शब्द नाही. ते लोकांना चुकीची माहिती देत आहेत.

Protest in Panjim against IIT Goa Sanguem
Marigold In Sattari: सत्तरी तालुका ‘झेंडूमय’; दिवाळीत 1 टन फुलांची विक्री

मिल्टन फर्नांडिस म्हणाले, मनोहर पर्रीकरांचे स्वप्न आयआयटीचे होते, ते फर्मागुडी येथे पूर्ण केले आहे. मात्र आयआयटीच्या नावाने मांडलेला बाजार आता बंद करावा, कारण कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आमच्या शेतात होऊ देणार नाही.

कार्लाथ कारव्हालो म्हणाल्या, शेतकरी पैसे घेऊन आंदोलनाला बसले, असा खोटा आरोप करून शेतकऱ्यांचा अपमान आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे, ती थांबवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com