Goa : अपहरण प्रकरणातील संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रानुसार, 11 फेब्रुवारी 2021 रोजी शापुर जारीफी यांचे अपहरण (kidnapping) झाल्याची तक्रार त्याच्या मैत्रिणीने पोलिसांकडे केली.
Goa : अपहरण प्रकरणातील संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला
दक्षिण गोवा (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला.Dainik Gomantak

सासष्टी - विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून अफगाणी नागरित्व असलेला शापुर जारीफी याची फसवणूक (Fraud) करून अपहरण केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी अटक केलेल्या 13 जणांपैकी संशयित आरोपी आलेक्स डिसोझा, अनुराग कुमार, विशाल गोस्वामी, संजू सिंग व रॉबिसन डिसोझा या पाच जणांनी दक्षिण गोवा (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला.

दक्षिण गोवा (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला.
स्वयंपूर्ण गोवा योजनेला १ जुलैपासून पुन्हा चालना : मुख्यमंत्री

अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपाल पाटकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू होती तर सरकारी वकील उत्कर्ष आवडे हे शासनातर्फे बाजू मांडत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रानुसार,11 फेब्रुवारी 2021 रोजी शापुर जारीफी यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या मैत्रिणीने पोलिसांकडे केली.

पोलिसांनी त्वरीत कारवाई करून पर्वरी येथील एका बंगल्यावर छापा टाकून संशयित सुशील सिंग, आशिष त्रिपाठी, रजत कल्याण, साहिल कल्याण, प्रदीप कुमार, विजय, अनिल कुमार, आलेक्स डिसोझा, अनुराग कुमार, विशाल गोस्वामी, संजू सिंग, रॉबिसन डिसोझा या बारा आणि एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन शापुर आणि अन्य एका पंजाबी व्यक्तीची सुटका केली.

दक्षिण गोवा (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला.
गोवा-कर्नाटक सीमेलगतचा दुधसागर धबधबा कॅसलरॉकपासून 13 कि.मी. अंतरावर

सुशील हा दिल्लीतील एजंट कॅनडामध्ये नोकरीसाठी जाण्यास इच्छुक असलेले गिऱ्हाईक हेरून त्याला सर्व कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने गोव्यात सुशील सिंगकडे पाठवून त्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत होता. यात शापुर जारीफी हा अफगाणी युवक यात फसला. कॅनडा जायची कागदपत्रे तयार असल्याचे सांगून सिंग याने 7 फेब्रुवारी रोजी शापुर याला गोव्यात बोलविले.

शापुर मूळ दिल्लीत राहत असून वास्को येथे संशयिताला भेटण्यासाठी आला होता तर येथे आल्यावर कागदपत्रांसाठी त्याच्याकडे 2 लाख घेण्यात आले आणि त्याचे अपहरण करून त्याला पर्वरी येथील एका बंगल्यावर बंदिस्त ठेवण्यात आले होते. संशयितांनी पर्वरी येथील बंगला अपहृत व्यक्तींना ठेवण्यासाठी भाडेपट्टीवर घेतला होता.पोलिसांनी केलेल्या कारवाई शापुर बरोबर अन्य एका पंजाबी व्यक्तीचीही सुटका केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com