भंडारी समाज कोणाच्याही 'दावणी' ला बांधलेला नाही !

भंडारी समाज (Bhandari community) हा कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या 'दावणी' ला बांधलेला नाही, की पक्षाशी बांधील नाही.
भंडारी समाज कोणाच्याही 'दावणी' ला बांधलेला नाही !
Bhandari communityDainik Gomantak

डिचोली: भंडारी समाज (Bhandari Society) हा कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या 'दावणी'ला बांधलेला नाही, की पक्षाशी बांधील नाही. याचे भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीने भान ठेवावे. असे समाजाचे नेते तथा साखळीचे नगरसेवक यशवंत माडकर (Yashwant Madkar), कुडणेचे पंच तथा ओबीसी आयोगाचे सदस्य राजन फाळकर आणि अन्य समाज बांधवांनी स्पष्ट करून, कोणीही समाजाचे राजकारण करू नये. असे आवाहन केले आहे. केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणजे संपूर्ण भंडारी समाज नव्हे. असे राजन फाळकर यांनी स्पष्ट करून, वेळप्रसंगी अध्यक्ष अशोक नाईक यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासही समाजबांधव मागे राहणार नाहीत. असा इशाराही श्री. फाळकर यांनी दिला आहे.

'आप' चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समर्थन देताना संपूर्ण भंडारी समाज 'आप' च्या मागे असल्याचे जाहीर केल्याने सध्या भंडारी समाज बांधवांत असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर येथील दीनदयाळ सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेस हरवळेचे पंच गुरुप्रसाद नाईक, सूर्लाचे पंच सुभाष फोंडेकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, जयवंत खाडेकर, सुनिल फाळकर आणि उमेश नाईक हे उपस्थित होते.

Bhandari community
गोवा फॉरवर्ड का सोडला याबद्दल सरदेसाई यांच्याकडून खुलासा..!

आतापर्यंतच्या राजकीय नेत्यांनी भंडारी समाजासाठी काहीच केले नसल्याचा भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचा दावा चुकीचा आहे. असे यशवंत माडकर म्हणाले. भंडारी समाजाचे नेते नसतानाही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे वेळोवेळी भंडारी समाजाला सहकार्य मिळत आहे. त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षण 19 वरुन 27 टक्के झाले. मात्र त्यांनी कधीच समाजात राजकारण आणले नाही. असे यशवंत माडकर म्हणाले. समाज बांधव वेगवेगळ्या पक्षात आहेत. एक व्यक्ती पक्षात गेली म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. भंडारी समाज केवळ केजरीवालच नव्हे कोणाशीही बांधील नाही. असे गुरूप्रसाद नाईक म्हणाले. भंडारी समाजातील गरीब लोकांना वर काढण्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रयत्न असतात. असे सुभाष फोंडेकर म्हणाले.

विठोबा घाडी यांनी यावेळी अशोक नाईक यांच्यावर टीका करून त्यांचा निषेध केला. डिचोली तालुक्याची भंडारी समाजाची साधी समिती जाहीरपणे निवडणे शक्य झालेले नाही. यावरून त्यांची कुवत स्पष्ट होत आहे. अशोक नाईक समाजाचे अध्यक्षपद योग्य मार्गाने उपभोगत आहेत की नाही. त्याचे अगोदर त्यांनी अवलोकन करावे. असेही श्री. घाडी म्हणाले.

तर अध्यक्ष विरोधात मोर्चा

केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या कृतीचा राजन फाळकर यांनी निषेध केला. 'आप'च्या बॅनरवर भंडारी समाजाचा उल्लेख करणे, हे चुकीचे आहे. अशोक नाईक यांनी या प्रकाराविरोधात कारवाई करावी. अशी मागणी राजन फाळकर यांनी केली आहे. अन्यथा समाज बांधव त्यांच्या विरोधात मोर्चा काढणार. असा इशारा दिला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com