Karnataka Election Result 2023 : मुख्यमंत्री, मिसेस मुख्यमंत्री, साळकर, फळदेसाई ‘पास’

सदानंद शेट तानावडे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुठे चुकलो? याचे चिंतन तर होणारच
Karnataka Election Result
Karnataka Election ResultDainik Gomantak

Karnataka Election Result अखेर कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपला राज्य गमवावे लागले. पुरती नामुष्की झाली. आम्ही नेमके कुठे चुकलो, याचे चिंतन तर होणारच असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, गोव्यातल्या नेत्यांवर आठ मतदारसंघांचे प्रभारीपद होते.

यापैकी चार जागा जिंकण्यात भाजप यशस्वी झाला. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत, वास्कोचे आमदार दाजी साळकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचा समावेश आहे.

भाजपने या निवडणुकीसाठी केंद्रीय पातळीपासून स्थानिक, बुथ स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात नियोजन केले होते. हे नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी देशभरातून हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत उतरविले होते.

Karnataka Election Result
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला ‘संजीवनी’; कमळ कोमेजले

येथे झाले भाजपचे उमेदवार विजयी:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर बेळगावमधील दक्षिण, उत्तर व ग्रामीण मतदारसंघांची जबाबदारी होती. यातील एक जागा भाजपने जिंकली. तर त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर खानापूर मतदारसंघाची जबाबदारी होती.

तिथे भाजपचे विठ्ठल हलगेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. कुमठा मतदारसंघात भाजपचे दिनकर शेट्टी विजयी झाले.

या मतदारसंघाची जबाबदारी दाजी साळकर यांच्यावर होती. फळदेसाई यांच्याकडे येलापूर मतदारसंघाची जबाबदारी होते. तिथेही भाजप उमेदवार विजयी झाला.

Karnataka Election Result
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात ‘तीन-म’ फॅक्टरची किमया

येथे भाजपचा पराभव :

तानावडे यांनी चिकमंगळूर, कवळेकर यांनी बंगळुरू, काब्राल यांनी उत्तर कन्नडा, दामू नाईक यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता.

सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्याकडे सिरशी, प्रेमेंद्र शेट यांच्याकडे कारवार, उल्हास तुयेकर यांच्याकडे भटकळ, सावईकर यांच्याकडे मंगळुरू ग्रामीण, सर्वानंद भगत यांच्याकडे बेळगाव अशा जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. या जागांवर भाजपला हार पत्करावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com