'जनतेपासून दूर राहिलेल्या भाजपला आता लोकांच्या घरी जाण्याची लगीनघाई'
Girish ChodankarDainik Gomantak

'जनतेपासून दूर राहिलेल्या भाजपला आता लोकांच्या घरी जाण्याची लगीनघाई'

भाजपचे सरकार (BJP Government) आणी अनुशासन आतापर्यंत गोमंतकीय जनतेपासून फारच दुर होते आणी आजही आहे.

शिवोली: भाजपचे सरकार (BJP Government) आणी अनुशासन आतापर्यंत गोमंतकीय जनतेपासून फारच दुर होते आणी आजही आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर सारवासारव करण्यासाठी सरकार तुमच्या दारी म्हणत टाहो फोडण्याची त्यांच्यावर वेळच आली नसती असा थेट आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी शिवोलीत केला. कॉग्रेसच्या (Congress) महागाईविरोधात आयोजित  राज्यस्तरीय  कार्यक्रमाचा एक भाग या नात्याने शिवोलीत काढण्यात आलेल्या जागोर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बादें -आंसगांव येथे नवीन कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर  चोडणकर बोलत होते.

यावेळी सडयेचे माजी उप- सरपंच तथा स्थानिक कोमुनिदादचे अध्यक्ष लियो डायस यांना चोडणकर यांच्या उपस्थितीत रितसर पक्ष प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रभारी बाबी बागकर,प्रदेश समितीच्या उपाध्यक्ष डॉ. प्रमोदा सांळगांवकर शिवोली गट कॉग्रेसच्या अध्यक्षा पार्वती नागवेंकर, माजी आमदार तथा कॉग्रेसचे नेते चंद्रकांत चोडणकर, सेवा दल शिवोलीचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर, म्हापसा नगरपारीकेचे नगरसेवक तारक आरोलकर, सडयेचे माजी सरपंच फ्रान्सिस्को डिसौझा, युवा अध्यक्ष अड. रोशन चोडणकर, माजी गटाध्यक्ष राजन घाटे आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार असून शिवोलीचा विजयी कॉग्रेस उमेदवार आमदार म्हणून त्या सत्तेत राहाणार असल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले.

Girish Chodankar
"अब की बार भाजपा की हार": रमाकांत खलप

डॉ. प्रमोदा सांळगांवकर, अड. चंद्रकांत चोडणकर, दत्ताराम पेडणेकर, बाबी बागकर, फ्रांन्सिस्को डिसौझा, यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवा अध्यक्ष अड. रोशन चोडणकर, जगन्नाथ गांवकर आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली. यावेळी शिवोली बाजार परिसरात कॉग्रेस गट समीती व इतरांकडून चुलीवर चहा शिजवून भाजप सरकार प्रणीत महागाई विरोधात निषेधात्मक जाहीर जागोर करण्यात आला. सुरुवातीला, गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर माजी गट अध्यक्ष राजन घाटे यांनी सुत्रसंचालन सांभाळले.

गिरीश चोडणकर ( प्रदेशाध्यक्ष ) : कॉग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारसरणी घेऊन पुढे जाणारा राष्ट्रीय पक्ष असल्याने या पक्षाची दारे सर्वासाठी उघडी आहेत असे सांगितले. भाजप सरकारने एक महागाईच नव्हे तर बेरोजगारी, खणींचा प्रलंबीत प्रश्न, टेक्सीचालकांचा वाद आदी प्रश्नांवरुन जनतेचा विश्वास गमावला आहे.

लियो डायस (सडये कोमुनिदादचे अध्यक्ष ) : मी जन्मोजन्मीचा कॉग्रेस मन आहे. कॉग्रेसची ध्येयधोरणे आमच्या रक्तामांसात मिसळलेली आहेत त्यामुळे कॉग्रेस प्रवेश माझ्यासाठी एकप्रकारची घर वापसीच आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com