बाळ्ळीतील नाल्यात आढळला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह!

मासेमारीसाठी जात असल्याचे सांगून उल्हास गावकर घराबाहेर पडला रात्री घरी न परतल्याने, कुंकळ्ळी पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा बाळ्ळीतील नाल्यात मृतदेह आढळला.
बाळ्ळीतील नाल्यात आढळला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह!
Body was found in the DrainDainik Gomantak

बाळ्ळी (Balli) येथील निर्जन ठिकाणच्या एका नाल्यात (Body was found in the Drain) अंदाजे 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या भागात खळबळ उडाली. मृतदेह सापडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, राज्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्तळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Body was found in the Drain
पेडणेचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली;पाहा व्हिडिओ

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव उल्हास गावकर असून, तो बाळ्ळी येथील रहिवासी असल्याचे समजते. उल्हास हा मंगळवारी मासेमारीसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरा पर्यन्त तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी कुंकळ्ळी पोलिसांत त्या संबधित तक्रार नोंद केली होती.

बुधवारी कुंकळ्ळी पोलिसांना बाळ्ळी येथील नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक यांनी त्यांच्या पथकासह घटनास्तळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com