मुंबईहून पळालेला मुलगा मडगाव पोलिसांच्या ताब्यात
goa policeDainik Gomantak

मुंबईहून पळालेला मुलगा मडगाव पोलिसांच्या ताब्यात

तपासा दरम्यान मनपाडा पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर त्याचे लोकेशन ट्रेस केले

फातोर्डा : कोकण रेल्वे पोलिसांनी कल्याण - मुंबई येथून पळून आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला मडगाव येथील रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन मंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र येथे राहणारा हा अल्पवयीन मुलगा असून मनपाडा पोलिस स्टेशनमध्ये हा मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंद झाली होती.

goa police
गोवेकरांनो रेल्वेने प्रवास करायचा असेल तर...

या अल्पवयीन मुलासंबंधी अशी माहिती समोर आली आहे, की हा अल्पवयीन मुलगा 5 जानेवारी 2022 रोजी रात्री 10.30 वाजता महाविद्यालयात जाण्याच्या बहाण्याने घरातून पळून गेला. 6 जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजता गोव्यात (goa) आला, त्यानंतर पणजी येथे एक दिवस या मुलाने घालवला आणि 7 जानेवारी रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर आला. तपासा दरम्यान मनपाडा पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर त्याचे लोकेशन ट्रेस केले. कोकण रेल्वे (Railways) स्थानकावर या मुलाबद्दल माहिती दिली, त्यानुसार आम्ही त्याचा शोध घेत मनपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे कोकण रेल्वे स्थानकाचे पोलिस (police) निरीक्षक हिरू कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com