Goa Accident: कारची विजेच्या खांबाला धडक!

अपघात कसा काय घडला व कार मधील प्रवासी जखमी झाले की नाही हे कळू शकले नाही.
Accident
AccidentDainik Gomantak

वास्को: शनिवारी पहाटे गांधीनगर मांगुरहिल येथे चौपदरी मार्गावर कार विजेच्या खांबावर धडक देऊन वीज खांब आडवा केला. अपघात कसा काय घडला व कार मधील प्रवासी जखमी झाले की नाही हे कळू शकले नाही.

(The car hit the electric pole in Goa)

Accident
Goa Panchayat Election : सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीची उत्सुकता

शुक्रवारी शिरदोण येथील नवीन फ्लाय ओवर वर दुपारी बीएमडब्ल्यू कारने तीन पथदिव्यांचे नुकसान केल्याचा विचित्र अपघातानंतर आज आणखी एका अपघातात गांधीनगर मांगोरील येथे वेगवान कारने चौपदरी मार्गावर पहाटे दुभाजकामध्ये असलेल्या खांबाला जोरदार धडक दिली. सदर धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेत सदर वीज खांब मुळापासून उन्हाळून रस्त्यावर आडवा झाला. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर अपघातग्रस्त कार कोणत्या दिशेने जात होती आणि कारमधील प्रवासी जखमी झाले की नाही हे कळू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com