Goa: कुंकळ्ळी नगरपालिकेतील फाईली होतात गायब

नगरसेवकाची गोवा फॉरवर्डकडे हस्तक्षेपाची मागणी (Goa)
Goa: कुंकळ्ळी नगरपालिकेतील फाईली होतात गायब
गोवा फोरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई सरचिटणीस दुर्गदस कामत सोबत कुककळीचे नगरसेवक उद्देश भिकु नाईक - देसाई (Goa)दैनिक गोमन्तक

Goa: कुंकळ्ळी पालिकेचे (Cuncolim Municipality) नगरसेवक (Corporator) उद्धेश भिकू नाईक - देसाई यांनी मंगळवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (GFP President Vijay Sardesai) यांची भेट घेऊन त्यांना पालिकेत फाईली गायब होण्याच्या बाबतीत माहिती दिली, असे हे प्रकार बंद करण्यासाठी त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. नगरसेवक देसाई यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेत फायली गायब झाल्याच्या प्रकरणामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यांनी स्वता पालिकेच्या संदर्भात दिलेले एक पत्रही गायब झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटना) दुर्गादास कामतही यावेळी उपस्थित होते.

गोवा फोरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई सरचिटणीस दुर्गदस कामत सोबत कुककळीचे नगरसेवक उद्देश भिकु नाईक - देसाई (Goa)
Goa Politics: मांद्रे मतदार संघातील कॉंग्रेसची उमेदवारी सतीश शेटगावकरांना?

“गेल्या एक महिन्यापासून मी संबंधित कर्मचाऱ्यांना माझ्याकडून सादर केलेल्या पत्राचा शोध घेण्यास सांगत आहे, परंतु त्यांना ते सापडत नाही. पालिका कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या महत्वाच्या फायली गायब होत आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली. सरदेसाई यांनी त्यांना या समस्येबाबत पालिका प्रशासकाशी आपण बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. "अशी चूक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या फायल्स गायब होणे हे चुकीचे आहे. ही एक गंभीर समस्या आहे आणि म्हणूनच कुंकळ्ळीतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे.” असे फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले.

गोवा फोरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई सरचिटणीस दुर्गदस कामत सोबत कुककळीचे नगरसेवक उद्देश भिकु नाईक - देसाई (Goa)
Goa: लोलये पंचायत क्षेत्रातील जैवविविधतेने संपन्न माड्डीतळप पठार

नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे कार्यकारी प्रमुख असल्याने फायली हाताळण्यास जबाबदार असल्याचेही सरदेसाई म्हणाले. “या भाजप सरकारप्रमाणे, सत्ताधारी राजकारण्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे अधिकारी सुस्त झाले आहेत आणि त्यांना कसलेच गांभीर्य नाही. या समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे आणि गोवा फॉरवर्ड निश्चितपणे या समस्येकडे लक्ष देईल.” असे सरदेसाई म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com