सध्याचे सरकार मुस्कटदाबी करणारे

एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप : सर्वांच्या एकजुटीची गरज व्यक्त
Goa Latest News
Goa Latest NewsDainik Gomantak

मडगाव : मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, निवृत्त पोलीस अधिकारी आर. बी. श्रीकुमार आणि पत्रकार महमद झुबेर यांना केलेली अटक बेकायदेशीर असून त्यांना त्वरित मुक्त करावे, अशी मागणी आज 'कन्सरन सिटीझन्स ऑफ गोवा' या कार्यकर्त्यांच्या गटाने केला.

Goa Latest News
वीज बिल सवलत घोटाळ्याची सुनावणी पुन्हा तहकूब

या अटकेचा निषेध करण्यासाठी आज या कार्यकर्त्यांच्या गटाने मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण रीतीने निदर्शने करण्याची परवानगी मागितली होती. मात्र वाढत्या कोविडचे कारण पुढे करून ती जिल्हा प्रशासनाकडून नाकारण्यात आली.

सामाजिक कार्यकर्त्या आल्बेर्टीना आल्मेदा यांनी प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करताना गोव्यात कोविड निर्बंध कुठेच लागू नसताना या निदर्शनास परवानगी नाकारण्यासाठी प्रशासन कोविडचे करण कसे देऊ शकते असा सवाल केला.

यावेळी बोलताना आयटकचे गोवा अध्यक्ष प्रसन्न उटगी यांनी सध्याचे सरकार हे लोकांचा आवाज दाबणारे असून सेटलवाड याना झालेली अटक अशाच मुस्कटदाबीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोव्यातही असे प्रकार वाढू लागले असून लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हणून पाडायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन त्यांना विरोध कटण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com