water canal
water canalDainik Gomantak

Goa: मयडेतील बंधाऱ्यास पुन्हा भगदाड; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जलस्रोतमंत्र्यांकडे धाव घेण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

water canal: मयडे गावातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून अद्यापही कार्यवाही न झाल्याने नाराज शेतकऱ्यांनी दिलासा मिळण्याच्या आशेने जलस्त्रोत मंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आताफोंड-कालीझरच्या टेनंट असिएशनने तीन किलोमीटरचा हा पट्टा साफ करण्याचे काम हाती घेतले आहे आणि बांधावरील आठ फुटांची दुरुस्ती केली. इतके प्रयत्न करूनही वारंवार भगदाड पडताहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करणे कठीण बनले आहे.

पुन्हा एकदा बंधाऱ्यास भगदाड पडले आहे. परिणामी शेतात क्षारयुक्त पाणी शिरल्याने आळसांदे, मिरचीचे पीक खराब होत असल्याचे आताफोंड कालीझर टेनंट असोसिएशनचे फिलीप डिसोझा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून अनुदान मिळालेले नाही, ते सरकारने द्यावे. भाडेकरू असोसिएशनच्या अध्यक्षांनीही संघटनेचे स्वखर्चाने आठ ठिकाणी भगदाड दुरुस्त केले असून अद्याप अनुदान मिळालेले नाही, असे सांगून शासनाने ते देण्याचे आवाहन केले.

water canal
Goa: योगासने, भजनं करण्यात विदेशी पर्यटक दंग; नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत

आताफोंड-कालीझर येथील बांध हा मयडे गावातील प्रमुख बांधांपैकी एक आहे. जो नदीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधला आहे. जेणेकरुन शेतीचे संरक्षण करून लागवडीची कामे करता येतील. मात्र, कालांतराने हा बांध कमकुवत झाला आहे.

परिणामी विविध ठिकाणी वारंवार भगदाड पडत असल्याने नदीचे खारे पाणी शेतात जाते. सध्या शेतीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनी बाधीत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बंधाऱ्यास भगदाड पडल्याने शेतात पाणी जाते. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. याशिवाय जवळच्या विहिरींनाही याचा फटक बसू शकतो. यावर उपाय योजना करायची गरज आहे. अशी आमची मागणी आहे. - शिवा साटेलकर, शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com