ठरले, म्हापसा शिगमोत्सव परंपरेनुसार रविवारीच होणार!

सरकारचा निर्णय : शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री सावंत यांची भेट
The delegation met Chief Minister Sawant
The delegation met Chief Minister SawantDainik Gomantak

येथील शिगमोत्सवातील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनकृत्य व वेशभूषा स्पर्धा ही सोमवार 13 मार्चऐवजी आता रविवार 12 मार्चला वर्षपद्धतीनुसार रविवारीच करण्याचे ठोस आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापशातील शिष्टमंडळाला आज सोमवारी पणजी येथील महालक्ष्मी या आपल्या शासकीय निवासस्थानी दिले. त्यामुळे शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

यावेळी माजी नगरसेवक तुषार टोपले, माजी नगरसेवक नारायण राटवड, समाज कार्यकर्ते संजय बर्डे, एकनाथ म्हापसेकर, राजू तेली हे उपस्थित होते. म्हापसा शहरातील शिगमोत्सव मागच्या 40 वर्षांपासून रविवारी साजरा करण्याची परंपरा आहे.

त्यादिवशी ग्रामदेवता श्री शांतादुर्गा, राखणदार देव बोडगेश्वर व शहरातील राष्ट्रोळी देवांना सिनेअंलकार जवळील श्री राष्ट्रोळीजवळ नमन करुन शिगमोत्सवाला सुरवात केली जाते. या शिगमोत्सवाला धार्मिक अधिष्ठान आहे. तसेच यंदा सोमवार 13 रोजी म्हापशाची ग्रामदेवता श्री सातेरी देवीचा गुलालोत्सव आहे.

ज्या काळात सरकारचे अनुदान मिळत नव्हते, तेव्हापासून गोव्यात सर्वप्रथम शिगमोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, अशी माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली.

मुख्यमंत्र्यांची तत्परता

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना फोन करुन म्हापसा शहरातील शिगमोत्सव सोमवार ऐवजी रविवारी साजरा करण्यास आपण मान्यता देतो.

तेव्हा पर्यटन खात्याकडून म्हापसा शहरातील शिगमोत्सवाची तारीख 12 मार्च रोजी घोषित करण्याचे निर्देश दिले. म्हापसा शहराच्या शिगमोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे व ती खंडित होता कामा नये असेही त्यांनी सूचित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com