बाबू आजगावकरांमुळेच पेडण्याचा सुपरफास्ट विकास

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांनी भागिरथ प्रयत्नाने विकासाची गंगा आणून या भागाचा कायापालट केला.
बाबू आजगावकरांमुळेच पेडण्याचा सुपरफास्ट विकास
Deputy Chief Minister Babu AzgawkarDainik Gomantak

पेडणे ः स्वातंत्र्यानंतरही बराच काळ उपेक्षा झाल्याने मागास राहिलेल्या पेडणे मतदारसंघात (Pernem Constituency) उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) यांनी भागिरथ प्रयत्नाने विकासाची गंगा आणून या भागाचा कायापालट केला. विरोधाची काविळ झालेल्यांच्या डोळ्यांना आजगावकरांनी पेडण्याचा केलेला हा सुपरफास्ट विकास नजरेस पडत नसून आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्याने केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कळशावकर हे आजगावकर यांच्यावर वृथा आरोप करत आहेत, अशी टिका  आजगावकर यांच्या समर्थकांनी केली आहे. कळशावकर यांच्या कुटील राजकीय कारस्थानास सूज्ञ पेडणेकर कधीच बळी पडणार नाहीत, असा विश्वास या समर्थकांनी व्यक्त केला आहे. 

इब्रामपूर हणखणेचे माजी सरपंच व सातेरी देवस्थानचे अध्यक्ष राजाराम गावस, इब्रामपूर हणखणेचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आत्माराम नाईक तसेच कोरगावचे सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर देऊसकर व उमेश पोळजी यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांतून आजगावकर यांच्यावर कळशावकर यांनी केलेल्या टिकेस प्रत्युत्तर दिले आहे. आज आरोप करणारे कळशावकर हे गेली साडेचार वर्षे उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या सोबत राहून त्यांचे गुणगान गात होते. या साडेचार वर्षांत त्यांनी आजगावकर यांच्याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही. पण, आताच त्यांना आजगावकरांवर आरोप करण्याइतपत कोणता साक्षात्कार झाला, असा सवाल गावस यांनी केला आहे. आजगावकर यांच्यावर आरोप करण्यामागील कळशावकर यांचा राजकीय कावा पेडणेवासीय जाणून आहेत, असेही गावस यांनी सांगितले.

Deputy Chief Minister Babu Azgawkar
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या गट समितीची घोषणा

गोवा अॅंटिबायोटीकचे कर्मचारी असलेले कळशावकर यांनी करोडपती होण्याएवढी माया कशी कमावली त्याचे गुपित जनतेला कळणे आवश्यक आहे. भूखंडांचे गौडबंगाल करून तर त्यांनी ही माय कमवली नाही ना, असा सवाल गावस यांनी केला आहे. मिशन फाॅर लोकलचे राजन कोरगावकर गेली साडेचार वर्षे कुठे भूमिगत झाले होते, असा सवालही गावस यांनी केला आहे.

पेडणे मतदारसंघात बैलांच्या झुंजीचे बेकायदा आयोजन, भूखंडांचे गौडबंगाल करून भोळ्या नागरिकांची झालेली फसवणूक या सारख्या प्रकारांना आजगावकर यांनी थारा दिला नाही. समाजविघातक कारवायात गुंतलेल्या माफियांची पाठराखण त्यांनी केली नाही. म्हणून आज या माफियांची टोळी एक होऊन मिशन फाॅर लोकल या गोंडस नावाखाली पेडणेवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, पेडण्याचा गेल्या वीस वर्षांत झालेला विकास कसा व कोणामुळे झाला याची पेडणेवासीयांना पक्की जाणीव असून विकासाच्या मुद्यावर विरोधकांकडून होत असलेल्या अपप्रचारास पेडणेवासीय कधीच बळी पडणार नाही, असे देऊसकर यांनी सांगितले.

Deputy Chief Minister Babu Azgawkar
Goa Election: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी तुळशीदास फळदेसाई एकनिष्ठ

आजगावकर यांनी प्रतिनिधीत्व केल्यापासून या मतदारसंघात विकासाची गंगा वाहू लागली. विज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा पुरवितानाच मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सारखे रोजगारक्षम महाप्रकल्प आणून पेडणे मतदारसंघाला विकासाच्या सुपर एक्स्प्रेस हायवेवर नेले. या प्रकल्पांमुळे हा मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे. रोजगार व व्यवसायाच्या असंख्य संधी या प्रकल्पांद्वारे स्थानिकांना उपलब्ध होत आहेत. याचा लाभ समस्त पेडणेवासीयांना मिळणार आहे. आजगावकर यांची दूरदृष्टी व धडाडी यामुळेच आज हे शक्य झाले असल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले. आजगावकर यांच्या अधिकार कक्षेतील गोवा फुटबाॅल विकास महामंडळावर अर्जुन पुरस्कार विजेते फुटबाॅलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांची नियुक्ती झालेली आहे. राज्य खेळाचा दर्जा देण्यात आलेल्या फुटबाॅलचा योग्य पद्धतीने विकास व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विरोधकांनी आधी या गोष्टीचा अभ्यास करूनच आरोप करावेत असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

Deputy Chief Minister Babu Azgawkar
Goa Assembly Election : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार- ढवळीकर

आजगावकर यांनी नेहमीच पेडणेकरांचा स्वाभिमान उंचावणारेच निर्णय घेतले आहेत. पेडणेकरांची मान ताठ राहावी हे ध्येय बाळगूनच त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य केले आहे, असे नाईक यांनी सांगितले. पेडण्याचा (पूर्वीच्या धारगळ मतदारसंघासह) विकास केवळ आजगावकर यांच्यामुळेच झाला असून असा सुपरफास्ट विकास करण्याची धमक केवळ आजगावकर यांच्याकडेच असल्याची पेडणेवासीयांची भावना आहे. विरोधकांनी भूलथाापा मारून दिशाभूल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आगामी निवडणुकीत पेडणेवासीय आजगावकर यांनाच निवडून आणतील असा विश्वास पोळजी यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com