Vijai Sardesai : ‘भूमाफियांची हाव, सरकारची अनास्था आगीस कारण’ : विजय सरदेसाई

पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची मदत घ्या
MLA Vijai Sardesai
MLA Vijai Sardesai Dainik Gomantak

म्हादई अभयारण्यात आग पसरण्यास भूमाफिया व आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणारे सरकार कारणीभूत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

आग आटोक्यात येत नसेल तर पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची मदत घ्या, असा सल्ला मी आधीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वनमंत्री विश्वजीत राणे यांना दिला होता, असे ते म्हणाले.

MLA Vijai Sardesai
Goa Shigmotsav 2023 : न्हयबाग-पेडणेत शिगमोत्सव; आमदारही आनंदोत्सवात सहभागी

पहिला संकेत

राज्य आपत्ती व्यवस्थापन मूल्यांकनाबद्दल ‘एनडीआरएफ’च्या नोव्हेंबर 2021 मधील अहवालात गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आपत्ती व्यवस्थापनातील मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांच्यातील त्रुटी दाखवली होती.

राज्याने वन व औद्योगिक क्षेत्रात होऊ शकणाऱ्या आपत्तींचा आढावा घेऊन उपाययोजना ठरवावी, असे स्पष्ट म्हटले होते. पण त्या अहवालाकडे दुर्लक्ष केले गेले, असे सरदेसाई म्हणाले.

MLA Vijai Sardesai
Somwar Upay For Business: तुम्हालाही बिझनेसमध्ये वृद्धी हवीय? तर आजच करा हे उपाय

दुसरा संकेत

2019 मध्ये हवामान बदलासंदर्भात राज्य कृती आराखडा तयार केला होता. गोव्यात वणवा पेटू शकतो, याकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी 46 कोटींची आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केली होती.

मात्र, इव्हेंटवर कोट्यवधी रुपये खर्चणाऱ्या सरकारने या योजनेसाठी एक रुपयाही खर्च केला नाही, असे ते म्हणाले.

तिसरा संकेत

पिळर्ण येथील बर्जर पेंट कंपनीला आग लागली, ती विझविण्यासाठी राज्याची अग्निशमन व्यवस्था कुचकामी आहे, हे त्यावेळी स्पष्ट झाले होते. ही यंत्रणा आणखी सुदृढ करण्यावर सरकारने काहीच केले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com