
कदंब वाहतूक महामंडळाचे कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत. ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात, असे प्रशंसोद्गार महामंडळाचे अधिकारी महेंद्र पेडणेकर यांनी काढले. निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य आणि भवितव्याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
डिचोली पंचक्रोशी कदंब वाहतूक कर्मचारी संघातर्फे आयोजित निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात पेडणेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
अस्नोडा कदंब बसस्थानक सभागृहात काल रविवारी झालेल्या या सोहळ्यास कदंबचे माजी संचालक हरीश चोनकर, अस्नोड्याचे माजी सरपंच प्रदीप पेडणेकर, अधिकारी संकेत मांद्रेकर, देवीप्रसाद भट, निवृत्त अधिकारी अनिल वेंगुर्लेकर, आयोजक संघाचे अध्यक्ष रामा साळगावकर, सचिव नंदकुमार मोरजकर आणि खजिनदार दिलीप गावकर उपस्थित होते.
जनतेने कदंबच्या कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे, असे आवाहन प्रदीप पेडणेकर यांनी केले. यावेळी हरीश चोनकर, संकेत मांद्रेकर आणि देवीप्रसाद भट यांनीही कदंब कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कौतुक केले. स्वागत आणि पाहुण्यांची ओळख धनंजय मोने यांनी करून दिली. सूत्रसंचालन कलिका काजारी यांनी केले तर नीलेश काजारी यांनी आभार मानले.
सत्कारमूर्तींमध्ये मालवणकर, गाड्डी व मांद्रेकर : या सोहळ्यात उदय मालवणकर (साहाय्यक वाहतूक निरीक्षक), गोविंद गाड्डी (बसचालक) आणि देविदास मांद्रेकर (बसचालक) या कदंब वाहतूक महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देविप्रसाद भट, नीलेश काजारी आणि धनंजय मोने यांनी सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन केले. उदय मालवणकर आणि गोविंद गाड्डी यांनी मनोगत व्यक्त करताना अधिकारी आणि सहकारी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.