Power Outage in South Goa: नळ कोरडे, वीज गुल; लोक गेले निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिकला

दक्षिण गोव्यात देखभाल-दुरुस्तीसाठी पुरवठा बंद
Power outage
Power outageDainik Gomantak

Power Outage in South Goa: वीजवाहिन्या व संलग्न यंत्रणेच्या पावसाळापूर्व वार्षिक देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी संपूर्ण दक्षिण गोव्यातील वीजपुरवठा बंद ठेवला. वीज नाही म्हणून पाणीही नाही. तशात भयंकर उष्मा यांमुळे दक्षिण गोव्यातील लोक भयंकर हैराण झाले.

त्यामुळे अनेकांनी आपली वाहने घेऊन थेट निसर्गरम्य ठिकाणी पिकनिक केली. मात्र, बहुमजली इमारतीत रहाणाऱ्या लोकांना लिफ्ट चालू शकत नसल्याने पायपीट करावी लागली.

सुट्टीच्या दिवशी छोट्या पडद्यावरील मनोरंजन पाहणाऱ्यांची निराशा झाली. वीजपुरवठा नियोजित वेळी म्हणजे सकाळी ६ वा. खंडित केला; पण २ ऐवजी ३-३0 नंतर सुरू झाला.

वीज नसल्याने पाणीपुरवठाही बंद राहिला. मडगावात काही सभागृहात मंगल कार्ये होती, तेथे यजमानांनी विद्युत जनित्रांची व्यवस्था करून वेळ मारून नेली.

Power outage
Bank Fraud: पंजाब नॅशनल बँकेला 16 लाखांना गंडा, मडगाव येथील घटना

शेळपेत टाकी स्वच्छतेचा अडसर

शेळपे-सांगेतील पाण्याच्या मुख्य टाकीची स्वच्छता व इतर कामे हाती घेतल्याने पुरवठा बंद केला होता. केपे, सांगे, सावर्डे या ग्रामीण भागातील लोकांकडे साठवणुकीसाठी पाण्याच्या टाक्या नसल्याने त्यांनी भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवले.

पाणी दुपारी येणार, असे समजून त्यांनी पाण्याचा वापर केला; पण पाणी रात्री दहापर्यंत न आल्याने लोकांचे बरेच हाल झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com